साडेतीन कोटींचा गंडा

By Admin | Published: August 1, 2014 12:33 AM2014-08-01T00:33:51+5:302014-08-01T01:06:08+5:30

हदगाव : तालुक्यातील मरडगा हे गाव कळमनुरी व हदगावच्या सिमारेषेवरील असलेले ३ हजार वस्तीचे गाव.

Three crores of rupees | साडेतीन कोटींचा गंडा

साडेतीन कोटींचा गंडा

googlenewsNext

हदगाव : तालुक्यातील मरडगा हे गाव कळमनुरी व हदगावच्या सिमारेषेवरील असलेले ३ हजार वस्तीचे गाव. या गावातील सर्वच स्तरातील लोकांनी सुपर पॉवर केबीसी व कॅझाल या कंपनीत दाम दुप्पटीच्या आमिषाला बळी पडून ३ कोटी ४५ लक्ष रुपये गुंतवणूक केली आहे. यामुळे निराशेच्या काळोखात सध्या हे गाव बुडाले असून सर्वत्र याचविषयी चर्चा सुरू आहे.
सध्या राज्यात गाजत असलेल्या केबीसी व सुपरपॉवर या नातेवाईकाच्या असलेल्या कंपनीच्या आमिषाला हदगाव तालुकयातील मरडगा, आमगव्हाण, मार्लेगाव व नेवरी ही गावे बळी पडली आहेत. परंतु सर्वात जास्त गुंतवणूक मरड्याच्या ग्रामस्थांनी केली आहे. अंगणवाडी मदतनिस पासून मानकऱ्यापर्यंत सर्वच लोकांनी ३० महिन्यात टाकलेल्या रक्कमेच्या दुप्पट पैसे मिळणार म्हणून गुंतवणूक केली. परभणी शहरात याचे मुख्य कार्यालय सांगून गावातील सरपंच, तंटामुक्त अध्यक्ष व प्रतिष्ठीत मंडळी या कंपनीच्या गळाला लागले. त्यांनी एजन्ट म्हणून काम केले. जास्तीत जास्त एकाच वेळी ७ लाख रुपये मानकऱ्यांनी गुंतवणूक केली आहे तर कमीत कमी १५ हजार ५४० रुपयाची गुंतवणूक मजूरदारांनी केली आहे. एकमेकाच बघून घरातील धान्य विकून अंगावरील दागिणे तर काहींनी विमा कंपनीच्या पॉलीसी मोडून या कंपनीत भरले.
काही लोकांना याचे आश्चर्य वाटले. परंतु सर्व गावच कस बुडणार एवढे मोठ-मोठे माणस ७ लाख ५ लाख रुपये टाकतात तर आपले १५ हजार ३० हजार कसे बुडणार असा सल्ला देऊन एजंटांनी अख्ख गाव आर्थिक अंधाराच्या खाईत घातले.
३ हजार लोकवस्तीचं छोटस गाव प्रत्येक घरात २ किंवा ४ सदस्यांनी रक्कम भरलेली आहे. १ कोटी २७ लाख केबीसी २ कोटी सुपर पावर तर ८ लाख कॅझाल कंपनीत गुंतवणूक केली आहे. या कंपनीने दिलेले बोनसचे चेक वटत नसल्याने सहा महिन्यापूर्वी काही नागरिकांनी निवघा चौकी व हदगाव पोलिस स्टेशनला तक्रर दिली होती. परंतु हातावर अर्ज ठेऊन संबंधित एजंटांना भेटून प्रकरण दाबण्यात आल्याची प्रतिक्रिया सुमनबाई काळे यांनी दिली.
पंजाब नरवाडे १ लाख ५५ हजार ४००, कुसुम खंदारे ५० हजार, सुमनबाई काळे ३ लाख ३ हजार, सुनील नरवाडे १५ हजार ५४०, गजानन नरवाडे ३ लाख ६४ हजार, रामा नरवाडे १५ हजार ५४०, किशन नरवाडे १ लाख ९५ हजार, विमलबाई थोरात ७७ हजार, मानकरी लक्ष्मणराव ७ लाख, कृष्णकुमार काळे ६५ हजार, राजुपाल काळे १५ हजार ५४०, परसराम काळे १७ हजार, सुधाकर कोकरे १७ हजार, गणपत नरवाडे ३४ हजार, दाताराव काळे ३३ हजार, राजू नरवाडे ३१ हजार ५४०, सुरेश नरवाडे २२ हजार ५०० अशी पाच पानाची यादीच आहे. एकूण १७०० लोकांची फसवणूक झाली आहे. (वार्ताहर).
शेतात राबणाऱ्यांना फटका
गुंतवणूकदारांना २५५० रुपये व्याजापोटी ३ महिन्याच्या अंतराचे ६-४ चेकही देण्यात आले. ७५ हजार रुपये टाकणाऱ्या ग्राहकाला दीड लाखाचा चेक २१ सप्टेंबर २०१४ या तारखीचा देण्यात आलेला आहे. गावातील गजानन बापुराव काळे, जर्नार्धन काळे, ज्ञानेश्वर सोमाजी काळे, पद्माकर पांडुरंग काळे व अन्य या कंपनीचे एजंट झाले. या लोकांनी भरमसाठ कमाई केली, सायकल घेण्याची ऐपत नसणारे आज मार्शल गाड्यांनी फिरत आहेत. काहींनी नांदेड शहरात टोलेजंग इमारती बांधल्या. परंतु गावातील रोज मजुरी करणारे, वर्ष-वर्ष काबाडकष्ट करुन शेतीत राबणारे काडीमोड झाले.

Web Title: Three crores of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.