शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

ठेकेदारांना तीन कोटींचा दंड

By admin | Updated: May 23, 2014 00:20 IST

उस्मानाबाद : अवैधरित्या वाळूचा उपसा केल्याप्रकरणी परंडा, भूम तालुक्यातील तीन ठेकेदारांना उपविभागीय अधिकारी संतोष राऊत यांनी तब्बल तीन कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे़

 उस्मानाबाद : विना परवाना, अवैधरित्या वाळूचा उपसा केल्याप्रकरणी परंडा, भूम तालुक्यातील तीन ठेकेदारांना उपविभागीय अधिकारी संतोष राऊत यांनी तब्बल तीन कोटी, दोन लाख, ८४ हजार, ८०० रूपयांचा दंड ठोठावला आहे़ दरम्यान, प्रशासनाने तीन ठेकेदारांवर मोठी कारवाई केल्याने अवैधरित्या वाळूचा उपसा करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत़ परंडा तालुक्यातील कौडगाव, बंगाळवाडी, शिराळा, वागेगव्हाण येथील वाळू पट्ट्यांना जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे यांनी भूमचे उपविभागीय अधिकारी संतोष राऊत, परंड्याचे तहसीलदार शिवकुमार स्वामी, मंडळ अधिकारी देवकते यांच्यासोबत सात मे रोजी सकाळी भेट देवून पाहणी केली होती़ पाहणीदरम्यान काही ठेकेदार वाळूचा उपसा करताना नियम ढाब्यावर बसवित असल्याचे निदर्शनास आले़ वाळूचा उपसा करण्यासाठी सक्षम पंपाचा वापर करण्याची परवानगी नसतानाही त्याचा वापर सुरू होता़ पंपाद्वारे वाळू उपसा केल्यानंतर पाण्याखालील वाळूचा उपसा होण्याची दाट शक्यता असते़ ही गंभीर बाब लक्षात घेवून पथकाने उपविभागीय अधिकारी संतोष राऊत यांच्याशी चर्चा केली़ राऊत यांनी याबाबत भूजल सर्वेक्षण विभागाकडून अहवाल मागविला होता़ दरम्यान, जिल्हाधिकार्‍यांच्या सूचननेनुसार राऊत यांनी संबंधित ठेकेदारांनी उपसलेली वाळू आणि दिलेल्या पावत्या यांची तपासणी केली़ चौकशीदरम्यान तीन ठेकेदारांना शासनाच्या वाळू निर्गती धोरणानुसार पाणी असताना वाळू उपसा करण्यासाठी शासनाची लागणारी आवश्यक ती परवानगी नसल्याचे निदर्शनास आले़ त्यामुळे अवैधरित्या वाळू उपसा करणारे ठेकेदार विलास नरहरी उबाळे यांनी शिराळ येथून १४ फेब्रुवारी ते १४ एप्रिल या कालावधीत ६९६ ब्रास वाळू उपसा केल्याप्रकरणी ८९ लाख, ८ हजार ८०० रूपयांचा दंड, दुसरे ठेकेदार सुर्यकांत चंद्रकांत कांबळे (रा़वरूड ता़भूम) याने १३ जानेवारी ते १४ एप्रिल या कालावधीत १३९२ ब्रास वाळूचा उपसा केल्याप्रकरणी १ कोटी, ७८ लाख, १७ हजार, ६०० रूपये तर वांगेगव्हाण (ता़परंडा) येथील ठेकेदार रामराजे पांडुरंग पाटील यांनी २३ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत २७८ ब्रास वाळू उपसा केल्याप्रकरणी ३५ लाख, ५८ हजार, ४०० रूपयांचा दंड गुरूवारी ठोठावला आहे़ (प्रतिनिधी) जिल्हाधिकार्‍यांच्या अचानक तपासणीनंतर प्रशासनाकडून कारवाई. नारनवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली होती अचानक पाहणी. प्रशासनाला आता भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा. जिल्ह्यातील वाळू ठेकेदारांचे दणाणले धाबे. पाणी असताना केला होता वाळू उपसा. परवानगीविनाच उपसली वाळू. वाळू उपसा करताना ठेकेदारांकडून नियमबाह्यपणे सक्षम पंपाचा वापर केल्याचेही झाले उघड.