एका पुलाचे काम ‘तुकडे’ करीत तिघांना

By Admin | Updated: June 27, 2014 00:12 IST2014-06-26T23:28:49+5:302014-06-27T00:12:40+5:30

दत्ता थोरे , लातूर लातूरच्या बांधकाम विभागाने कामे देताना टेंडर योजनेला चांगलाच फाटा दिला. ३५ हून अधिक कामे तुकडे पाडून वाटण्यात आली आहेत.

Three bridges of a bridge work 'pieces' | एका पुलाचे काम ‘तुकडे’ करीत तिघांना

एका पुलाचे काम ‘तुकडे’ करीत तिघांना

दत्ता थोरे , लातूर
लातूरच्या बांधकाम विभागाने कामे देताना टेंडर योजनेला चांगलाच फाटा दिला. ३५ हून अधिक कामे तुकडे पाडून वाटण्यात आली आहेत. आश्चर्य म्हणजे एका पुलाचे काम टेंडर काढले तर एकालाच गेले असते परंतु ते सुध्दा तीन तुकडे पाडून तिघांना देण्यात आले. तसेच एकाच पुलावरच्या हॉटमिक्सच्या कामाचेही झाले आहे.
बांधकाम विभागाने टेंडर योजनेला कशी तिलांजली दिली हे पहायचे असेल तर चिखलठाणा कासारखेडा हा इतर जिल्हा मार्ग २६ हा रस्ता उत्तम उदाहरण आहे. या मार्गावर एक पूल बांधायचा होता. एकाच कंत्राटदाराला तुुकडे न पाडता हे काम दिले असते तर पुलाची एकसूत्रता राखणे सहज सोपे झाले असते. परंतु कागदे फिरली. एका पुलाच्या कामाचे चक्क तीन तुुकडे पाडले आणि त्याच्या तीन वर्कआॅर्डरी निघाल्या. टुकडे पाडताना कारण लिहिले या कामाची निकड लक्षात घेऊन निर्णय घेतल्याचे इंडोसमेंट टाकून तिघांना हे काम देऊन खुष करण्यात आले. यातील भाग एक ६ लाख ७५ हजाराला, भाग दोन ९ लाख ८६ हजाराला आणि भाग तीन ७ लाख २८ हजाराला दिला गेला. साऱ्या रकमा टुकडे पाडून दहा लाखाच्या ‘आत’ आणण्यात आल्या.
पुलावरच्या हॉटमिक्सचे कामाचेही सात तुुकडे
तो तर पुल होता. परंतु त्याहून आश्चर्य म्हणजे बार्शी-लातूर रस्ता राज्य मार्ग १४५ या महामार्गावर ६२० मीटर पुलावरच्या हॉटमिक्सचे कामाचे सात तुुकडे पाडण्यात आले. रुंदीला जास्त असलेल्या या कामाची एकूण किंमत ६२ लाख १४ हजार होती. नऊ लाख ८४ हजार प्रमाणे प्रत्येकी प्रति सात भाग तेही हॉटमिक्सचे कामाचे करून शिफारशी मजूर संस्थेला देण्यात आल्या. जिल्ह्यात कोणत्या मजूर संस्थेकडे हॉटमिक्स आहे ? हे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दाखवावे. जर मजूर संस्थेकडे हॉटमिक्स नसेल तर त्याची किंमत पाहता याचे टेंडर आवश्यकच होते. परंतु यातही तातडीनेचा शेरा मारून सात भागासह सात वर्कआॅर्डरीने काम करुन घेण्यात आले.
तीन महिन्याच्या टेंडर प्रक्रियेला फाटा दिला तुकड्यासाठी लागले एक वर्ष...
टेंडर प्रक्रियेला लागणारा वेळ हा तीन महिन्याचा आहे. पण जिल्ह्यातील एक रस्ता असा आहे की ज्याचे तुुकडे पाडण्यासाठी चक्क वर्ष लागले. तो म्हणजे हाळी वडगाव- डोंग्रज रस्ता प्रत्यक्षात किमी हा रस्ता. याचे तीन तीन तुकडे पाडले गेले. भाग एक भाग १४ लाख २४ हजार ३४४. दुसरा भाग १४ लाख ९६ हजार ८५७ तिसरा भाग : २ लाख १७ हजार १०८ अशा प्रत्येकी कामाच्या सूचना होत्या. या कामासाठी २०१० ११ मध्ये मंजूर झालेल्या या कामाचा जॉबक्रमांक १०-१६-रा-१-१०-०९९ रुपये ३६ लक्ष असा आहे. चाकूर अभियंता १३ /१२ २०११. ला / कार्यकारी अभियंता यांनी अधीक्षक अभियंत्याला ३ जानेवारी २०१२ ला पत्र लिहीले आणि अधीक्षक अभियंत्यानी कार्यकारी अभियंत्याला १३ जानेवारी २०१३ ला याच्या टुकड्याला मान्यता दिली. आ. बाबासाहेब पाटील यांनी हे काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दूरध्वनीवरुन दिले असल्याने उपअभियंता चाकूर यांनी या कामाचे तीन भागात तुकडे करून प्रस्ताव सादर केला. काम लवकर करण्यासाठी उपविभागीय अभियंता यांनी कोल्डमिक्स्ड पध्दतीने कामाची पध्दत सुरू केल्याने हा निर्णय घेतला. परंतु तीन महिन्यात टेंडर प्रक्रियेने पूर्ण होणाऱ्या या कामाला चक्क मान्यतेलाच वर्ष गेले.
गरज असेल तिथेच तुकडे : अभियंता बडे
बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कोणत्याही कामाचे नियम डावलून तुकडे पाडले नसल्याचे सांगितले. जिथे गरज होती, अशाच कामासाठी ही उपाययोजना झाली आहे. टेंडर पध्दतीमध्ये लातूरमध्ये सर्वाधिक कामे झाली आहेत. त्या तुलनेत तुकड्याने झालेली कामे दहा-पंधरा टक्केही नाहीत. विनाकारण गैरसमज पसरविले जात असल्याचे ते म्हणाले.
याची चौकशी व्हावी : गिल्डा
जितक्या कामाचे तुकडे पाडण्यात आलेले आहेत याची चौकशी करण्यात यावी. जर याच्यात कुणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. संतोष गिल्डा यांनी केली.

Web Title: Three bridges of a bridge work 'pieces'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.