तरुणाच्या खून प्रकरणी तिघा आरोपींना अटक
By Admin | Updated: November 19, 2016 00:44 IST2016-11-19T00:46:34+5:302016-11-19T00:44:13+5:30
लातूर : शहरातील कॉईल नगर परिसरत राहणाऱ्या एका तरुणाचा खून केल्याप्रकरणी फरार तीन आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली

तरुणाच्या खून प्रकरणी तिघा आरोपींना अटक
लातूर : शहरातील कॉईल नगर परिसरत राहणाऱ्या एका तरुणाचा खून केल्याप्रकरणी फरार तीन आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. गुन्ह्यात वापरलेले साहित्य आरोपींकडून पथकाने जप्त केले.
अक्षय उर्फ भुऱ्या गणपती अंकुशे (२१, रा. कॉईलनगर) याचा मोठा भाऊ सुरेश गणपती अंकुशे (२६) हा वेडसर होता. त्यामुळे आपला ठिकठिकाणी अपमान होत आहे. त्याच्यामुळेच आपले लग्न जमत नसल्याचे कारण पुढे करत त्याने परमेश्वर हणमंत रणदिवे (२१) आणि यश उर्फ मुखड्या श्रीनिवास वासरे (१८) यांच्या मदतीने २० आॅक्टोबर २०१६ रोजी रात्री ९ वा. टागोरनगरातील गार्डनमध्ये त्याचा खून केला. घटनेपासून आरोपी फरार होते. नातेवाईकांनी परमेश्वर रणदिवेवर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी प्रमुख आरोपीला पुण्यातून ताब्यात घेत शुक्रवारी सायंकाळी त्याला लातुरात आणले. अटकेतील तिघांही आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे.