तीन अपघात : शिक्षक, महिलेसह युवक ठार

By Admin | Updated: December 16, 2014 01:04 IST2014-12-16T00:39:16+5:302014-12-16T01:04:48+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या तीन अपघातात एका शिक्षकासह महिला व युवक असे तिघे ठार झाले़ हे अपघात घटना रविवारी,

Three accidents: the teacher, the young man along with the woman killed | तीन अपघात : शिक्षक, महिलेसह युवक ठार

तीन अपघात : शिक्षक, महिलेसह युवक ठार


उस्मानाबाद : जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या तीन अपघातात एका शिक्षकासह महिला व युवक असे तिघे ठार झाले़ हे अपघात घटना रविवारी, सोमवारी उस्मानाबाद तालुक्यातील बावी आश्रम शाळा, त्यापुढील दिपकनगर तांडा व तेर-वाणेवाडी मार्गावर हे अपघात घडले़
पोलिसांनी सांगितले की, भूम तालुक्यातील उळूप येथील शिक्षक गोरख सोपान वरळे हे सोमवारी सकाळी उमरगा येथे कामासाठी जात होते़ त्यांची दुचाकी (क्ऱ एम़ एच़ २५-वाय़ ८३२३) ही सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दिपकनगर तांड्याजवळ आली असता पाठीमागून आलेल्या टिप्परने (क्ऱएम़ एच़१३-ए़जी़३२८१) जोराची धडक दिली़ या अपघातात गोरख वरळे यांचा जागीच मृत्यू झाला़ या प्रकरणी संदीप सोपान वरळे (रा़ उळूप) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टिप्परचालक पांडुरंग निवृत्ती खरात (रा़ कापसी सा़ ता़बार्शी) याच्याविरूध्द उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब गावडे हे करीत आहेत़
पुणे जिल्ह्यातील मोरे वस्ती येथील माधुरी बाबासाहेब येडे (वय-३५) व त्यांचे पती हे रविवारी सोलापूर- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरून तुळजापूरहून येरमाळ्याकडे जात होते़ त्यांची दुचाकी बावीनजीकच्या आश्रमशाळेजवळ आली असता महामार्गावरील गतीरोधकावर बसलेल्या हदऱ्यात माधुरी येडे या खाली पडल्या़ या अपघातात माधुरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती़ त्यांना तातडीने उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले़ याबाबत डॉ़ लामतुरे यांनी दिलेल्या माहितीवरून शहर पोलिस ठाण्यात झिरोने नोंद करण्यात आली होती़ याबाबत मिळालेल्या कागदपत्रानुसार सोमवारी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास हेकॉ पुरके हे करीत आहेत़
उस्मानाबाद तालुक्यातील तेर-वाणेवाडी मार्गावर सोमवारी सायंकाळच्या सुमारास दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली़ या अपघातात काजळा (ता़उस्मानाबाद) येथील विवेक भगवान माळी (वय-२२) यांचा मृत्यू झाला़ तर जखमींना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ घटनास्थळी ढोकी पोलिसांनी धाव घेतली असून, पंचनाम्याची
प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले़ (प्रतिनिधी)

Web Title: Three accidents: the teacher, the young man along with the woman killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.