मीटरसाठी नळ कनेक्शन कापण्याच्या धमक्या!
By Admin | Updated: May 19, 2015 00:53 IST2015-05-19T00:41:06+5:302015-05-19T00:53:51+5:30
औरंगाबाद : शहरातील सर्वसामान्य मालमत्ताधारकांच्या नळाला मीटर बसविण्याची मोहीम औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने सुरू केली आहे.

मीटरसाठी नळ कनेक्शन कापण्याच्या धमक्या!
औरंगाबाद : शहरातील सर्वसामान्य मालमत्ताधारकांच्या नळाला मीटर बसविण्याची मोहीम औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने सुरू केली आहे. मीटर बसविण्यासाठी नागरिकांनी विरोध केल्यास त्यांना कनेक्शन कापण्याच्या चक्कधमक्या देण्यात येत आहेत. पाणीपट्टीव्यतिरिक्त औरंगाबादकरांना एका मीटरपोटी ३ हजार ६२१ रुपयांचा भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
शहरातील उच्चभ्रू आणि सुशिक्षित वसाहतींमध्ये सध्या मीटर बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरवर्षी नियमित पाणीपट्टी भरणाऱ्या आणि नियमांना घाबरणाऱ्या नागरिकांना कंपनीने सध्या लक्ष्य केले आहे. समांतर जलवाहिनी टाकण्याचे काम करणाऱ्या कंपनीचे अधिकारी व कर्मचारी विविध वसाहतींमध्ये फिरून मालमत्ताधारकांच्या नळांना मीटर बसवीत आहेत. मीटर न बसविल्यास लगेच नळ कनेक्शन कापण्याची धमकीही देण्यात येत आहे. ऐन उन्हाळ्यात टेन्शन नको म्हणून नागरिकही फारसा विरोध करायला तयार नाहीत. मीटर बसविल्यानंतर प्रत्येक मालमत्ताधारकाला एक पावती देण्यात येत आहे. या पावतीतील
महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युतीने औरंगाबादकरांना ‘अच्छे दिन’येतील असे दिवास्वप्न दाखविले होते. समांतरच्या कंत्राटदाराकडून नागरिकांची पिळवणूक होत असतानाही युतीचे नगरसेवक गप्प आहेत. मुस्लिम- दलितबहुल वसाहतींमध्ये मीटर बसविण्याचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे एमआयएमने अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.