कैद्याच्या नातेवाईकास धमकी; दोघांवर गुन्हा

By Admin | Updated: September 5, 2016 00:47 IST2016-09-05T00:41:35+5:302016-09-05T00:47:53+5:30

उस्मानाबाद : कारागृहातील कैद्याच्या नातेवाईकाला खोट्या केसेस करण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघाविरूध्द आनंदनगर पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना उस्मानाबाद शहरात घडली़

Threatens the prisoner's relative; Crime on both sides | कैद्याच्या नातेवाईकास धमकी; दोघांवर गुन्हा

कैद्याच्या नातेवाईकास धमकी; दोघांवर गुन्हा


उस्मानाबाद : कारागृहातील कैद्याच्या नातेवाईकाला खोट्या केसेस करण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघाविरूध्द आनंदनगर पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना उस्मानाबाद शहरात घडली़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जबरी अत्याचार प्रकरणात कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेला कैदी बाबू उर्फ सुरज आप्पाराव क्षीरसागर याने बुधवारी सकाळी कारागृहातच काचेच्या तुकड्याने डाव्या हाताच्या मनगटावरील नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता़ सुरज क्षीरसागर याला उपचारासाठी न्यायालयात दाखल करून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता़ या प्रकरणात सुरज क्षीरसागर याने उस्मानाबाद शहरातील दोघे जण नातेवाईकांना खोट्या केसेस करून अडकाविण्याची धमकी देवून दमदाटी केल्याची व यापूर्वीही त्यालाही अशाच प्रकारे त्रास दिल्याची तक्रार सुरज क्षीरसागर याने आनंदनगर पोलीस ठाण्यात दिली़ क्षीरसागर याच्या फिर्यादीवरून किरण जानराव व अमजद सय्यद या दोघाविरूध्द गुरनं २९२/१६ कलम ५०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Threatens the prisoner's relative; Crime on both sides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.