उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाला धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:06 IST2017-07-19T00:03:30+5:302017-07-19T00:06:50+5:30
गंगाखेड : तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा करणारे जेसीबी मशिन उपजिल्हाधिकारी यांच्या पथकाने १६ जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास पकडले.

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाला धमकी
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा करणारे जेसीबी मशिन उपजिल्हाधिकारी यांच्या पथकाने १६ जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास पकडले. जेसीबी मशिन पोलीस ठाण्यात कशी नेता? तुम्हाला पाहून घेऊ? अशी धमकी जेसीबी मशीन मालकाने उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाला दिली. या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
गंगाखेड तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून होणारे अवैध वाळू उत्खनन थांबविण्यासाठी गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले, मंडळ अधिकारी यु.टी. सरवदे, तलाठी शिवाजी मुरकुटे, चंद्रकांत साळवे, चालक कासले हे १६ जुलै रोजी दुपारी तीन वाजता मसला, पिंपरी शिवाराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात गेले होते.
यावेळी या पथकाला गोदावरी नदीपात्रातून दोन जेसीबी मशिनच्या सहाय्याने वाळू उत्खनन करीत दोन ट्रॅक्टर भरणे सुरू असल्याचे दिसले. उपविभागीय अधिकाऱ्यांचे पथक आल्याचे पाहून जेसीबी, ट्रॅक्टर चालकांनी पळ काढला. पथकाने पाठलाग करून एम.एच. ३७- एल. ६३७१ व विना नंबरची जेसीबी अशी दोन वाहने पकडली. चालक मात्र पळून गेले़