शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'सोलार ड्रायर'द्वारे पालेभाज्या, कांदा सुकविण्यातून छत्रपती संभाजीनगरात हजारोंना रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 19:55 IST

या योजनेची अंमलबजावणी करण्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा ३ वर्षांपासून देशात प्रथम आहे.

छत्रपती संभाजीनगर : तरुण, तरुणींनी नोकरीच्या मागे न लागता स्वत:चा उद्योग, व्यवसाय सुरू करून नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे बनावे, यासाठी कृषी विभागाच्या वतीने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा ३ वर्षांपासून देशात प्रथम आहे. या योजनेमुळे हजारोंना रोजगार उपलब्ध झाला आहे.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेला २०२१-२२ वर्षापासून सुरुवात झाली. तेव्हा एक जिल्हा एक उत्पादन यानुसार अन्नप्रक्रिया उद्योगासाठी अनुदान जाहीर करण्यात आले होते. २०२१-२२ साली जिल्ह्यात १०७ उद्योग उभारून देशात प्रथम क्रमांक पटकावला होता. २०२२-२३ या आर्थिक वर्षात जिल्ह्याला २२२ उद्योगांचे उद्दिष्ट होते. मात्र, जिल्ह्यातील बेरोजगारांनी या योजनेला प्रतिसाद देत तब्बल ७६१ अन्न प्रक्रिया उद्योग उभारून सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळविला. २०२३-२४ या आर्थिक वर्षात ६२५ उद्याेगांचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात ७६६ सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यात आले. यातील ९० टक्के उद्योग ग्रामीण भागात थाटण्यात आले. सोलार ड्रायरमध्ये कांदा, टाेमॅटाे, पालेभाज्या सुकवण्याचा उद्योग करणाऱ्यांची संख्या दीड हजारावर आहे. त्यांचा एका खासगी कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. कंपनी त्यांना कच्चा माल देते आणि तयार मालही विकत घेते. यातून या महिलांना ‘ऑफ सिझन’मध्येही रोजगार मिळाल्याचे कृषी विभागाचे उपसंचालक दीपक गवळी यांनी सांगितले.

१० लाखांपर्यंत अनुदानसूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर त्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या कर्जदारांना ३५ टक्के रक्कम अनुदान स्वरूपात शासनाकडून देण्यात येते. अनुदानाची रक्कम जास्तीत जास्त दहा लाखापर्यंत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यात १८४० सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगमागील तीन वर्षांत जिल्ह्यात एकूण १८४० सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आले आहेत. यात मसाले उद्योग, दुग्धजन्य पदार्थ तयार करणे, बेकरी उत्पादन, दाल मिल, फळांचा ज्यूस बनवणे, आवळा प्रक्रिया उद्योग, मका प्रक्रिया उद्योग, तेल घाणा, आलू चिप्स बनवणे, सोया प्रॉडक्ट कारखान्यांचा यात समावेश आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी