शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
4
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
5
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
6
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
7
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
8
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
9
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
10
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
11
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
12
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
13
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
14
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
15
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
20
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
Daily Top 2Weekly Top 5

पडेगावात एकाच रात्री ८ दुकाने फोडून हजारोंचा माल पळविला

By admin | Updated: January 23, 2015 00:56 IST

औरंगाबाद : पडेगावात चोरट्यांनी एकाच रात्री ८ दुकानांचे कुलूप तोडून हजारो रुपयांचा माल चोरून नेऊन पोलिसांची झोप उडवून टाकली

औरंगाबाद : पडेगावात चोरट्यांनी एकाच रात्री ८ दुकानांचे कुलूप तोडून हजारो रुपयांचा माल चोरून नेऊन पोलिसांची झोप उडवून टाकली. यादरम्यान, एका व्यक्तीवर हल्ला करून त्यास जखमी केल्याची घटना घडली असून, चोऱ्यामाऱ्याच्या घटनात वाढ झाली असून, पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पडेगाव राष्ट्रीय महामार्गावर असल्याने दिवस-रात्र वाहनांची वर्दळ सुरूच असते. पोलिसांची वाहने सारखी ये-जा करताना आढळतात. मात्र, रात्री एक वाजेच्या सुमारास गाव सुनसान झोपी जाते. त्यानंतर चोरट्यांनी एकानंतर एक, असे ८ दुकानांचे शटर व कुलूप तोडून आत प्रवेश करून चोऱ्या केल्या. सकाळी चहाच्या टपरीवाल्याने दुकान उघडले तेव्हा सर्व सामानाची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या चोरीच्या प्रकारामुळे संतप्त नागरिक व व्यापारी रोडवर आले होते. सय्यद मजीद याने सकाळी ७ वाजता छावणी पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलीस निरीक्षक गौतम फसले, सहायक निरीक्षक विजय घेरडे, सहायक फौजदार रहिम शेख यांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली. चोरीविषयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली.