उद्धारली कोटी कुळे़़़ भीमा तुझ्या जन्मामुळे़़़
By Admin | Updated: April 15, 2015 00:42 IST2015-04-15T00:34:06+5:302015-04-15T00:42:33+5:30
लातूर : भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांची १२४ वी जयंती लातूर जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली़ जयंती निमित्त लातूरच्या आंबेडकर पार्कवरील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या

उद्धारली कोटी कुळे़़़ भीमा तुझ्या जन्मामुळे़़़
लातूर : भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांची १२४ वी जयंती लातूर जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली़ जयंती निमित्त लातूरच्या आंबेडकर पार्कवरील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी अलोट जनसागर उसळला़ मंगळवारची सायंकाळ भिमसैनिकांच्या उत्साहाने फुलून गेली होती़ ढोल, ताशा आणि डॉल्बीच्या तालावर तरुणाईने ठेका धरला होता़ विविध पक्ष, संघटना व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी ७ वाजेपासूनच आंबेडकर पार्कवर अभिवादनासाठी मोठी गर्दी केली होती़
घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने मंगळवारी सकाळी १०़३० वाजता माजी मंत्री आ़ दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहन करण्यात आले़ यावेळी खा़ डॉ़ सुनील गायकवाड, आ़ विक्रम काळे, आ़ त्र्यंबक भिसे, महापौर अख्तर शेख, उपमहापौर कैलास कांबळे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय सोनकांबळे, उपाध्यक्ष बाबा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी माजी खा़डॉ़ जनार्दन वाघमारे, जि़प़ चे माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, माजी आ़ शिवाजीराव पाटील कव्हेकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष एस़आऱ देशमुख, नगरसेवक चंद्रकांत चिकटे, मकरंद सावे, राजकुमार जाधव, सपना किसवे, पंडित कावळे, जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष अॅड़ अण्णाराव पाटील, रावणराजे आतराम, प्रकाश घादगीने, प्राग़ोविंद घार, बसवंतअप्पा उबाळे, माजी नगरसेवक मोहन माने, मोईज शेख, तनिष्क कांबळे, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सचिव राहूल लातूरकर, विशाल सुरवसे, अमोल लांडगे, कमलाकर सोनवणे, सचिन गंगावणे, अॅड़ अतिष चिकटे, नितीन कांबळे, पृथ्वीराज सिरसाठ, प्रा़ अनंत लांडगे, साधु गायकवाड, संजय ओव्हळ, अॅड़ श्रीकांत सूर्यवंशी, नगरसेवक नवनाथ आल्टे, प्रा़डॉ़शिवाजी जवळगे, लक्ष्मण कांबळे आदींची उपस्थिती होती़
लातूर जिल्ह्यातही विविध सामाजिक उपक्रमांनी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली़ (प्रतिनिधी)