हजारो भाविकांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन
By Admin | Updated: November 14, 2015 00:50 IST2015-11-14T00:11:48+5:302015-11-14T00:50:09+5:30
तुळजापूर : दिवाळीची सुटी, शुक्रवार आणि भाऊबिज असा मुहूर्त साधत हजारो भाविकांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती़

हजारो भाविकांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन
तुळजापूर : दिवाळीची सुटी, शुक्रवार आणि भाऊबिज असा मुहूर्त साधत हजारो भाविकांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती़ त्यामुळे दिवसभर आई राजा उदो-उदोऽऽऽ च्या जयघोषाने तुळजाई नगरी दणाणली होती़
तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे दिवाळीच्या सुटीमुळे देवीदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे़ गुरूवारी सायंकाळपासून या गर्दीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले़ रात्री घाटशीळ वाहनतळ वाहनांनी भरले होते़ त्यामुळे भाविकांना भवानी रोड, शिवाजी चौक, उस्मानाबाद रोडवर वाहने लावावी लागली़ परिणामी झालेली वाहतुकीची कोंडी सोडविताना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते़ शिवाय शहरातील धर्मशाळा, भक्तनिवास, लॉजही भाविकांनी भरले होते़ भाविकांची गर्दी पाहता मंदिर रात्री दीड वाजता दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते़ रात्री दोन पासूनच अभिषेकासाठी भाविकांची अभिषेक मंडपात रांग लागली होती़ अभिषेक रांग मंडपाच्या बाहेर मैदानात लागल्या होत्या़ अभिषेकानंतर धर्मदर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती़ दिवसभर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले़ तर उस्मानाबाद मार्गावर दोन्ही बाजुंनी खासगी वाहनांची पार्किंग झाल्याने वाहतुकीची कोंडी होत होती़े