लाखो भाविकांचे कुलदैवत काळभैरव

By Admin | Updated: December 4, 2014 00:54 IST2014-12-04T00:19:00+5:302014-12-04T00:54:38+5:30

मोहनदास साखरे ,मांडवा बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यासह परराज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असणाऱ्या काळभैरवाची यात्रा दत्त जयंतीनिमित्त भरते.

Thousands of devotees of Kalvavaita Kalbhairav | लाखो भाविकांचे कुलदैवत काळभैरव

लाखो भाविकांचे कुलदैवत काळभैरव


मोहनदास साखरे ,मांडवा
बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यासह परराज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असणाऱ्या काळभैरवाची यात्रा दत्त जयंतीनिमित्त भरते. हा उत्सव तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा आढावा.
परळी तालुक्यातील मांडवा येथे काळभैरव देवस्थान आहे. या देवस्थानची यात्रा डिसेंबर महिन्यात व दत्त जयंतीनिमित्त पौर्णिमेला भरते. हा उत्सव तीन दिवस चालतो. यामध्ये कीर्तन, भजन, गायन यासारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्यामुळे भाविकांसह या कार्यक्रमांनी परिसर फुलून जातो.
घाटनांदूर येथील प्रभू सोमेश्वराच्या मंदिरातील शिवलिंगातून उगम पावलेल्या बोरणा नदीच्या काठावर व वटवृक्षाच्या मुळाशी अतिप्राचीन असे भगवान काळभैरव देवस्थान आहे. लाखो भाविकांचे हे कुलदैवत आहे. पूर्वेला मंदिराचा दरवाजा आहे. काळभैरव व नरुबा एकत्र बसलेले आहेत. गाभाऱ्यात त्यांच्या स्वतंत्र मूर्ती असून, नवसाला पावणारा काळभैरव अशी याची आख्यायिका आहे. दररोज येथे जिल्ह्यातील शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात.
आंध्रप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र आदी राज्यातील भाविक दर्शनासाठी येतात. विविध ठिकाणाहून ेयेथे दिंड्या येतात. यात्रेच्या दिवशी काळभैरवाच्या पालखीची मिरवणूक निघते. तीन दिवस संपूर्ण परिसर भाविकांच्या गर्दीने व कार्यक्रमांच्या रेलचेलीने गजबजून गेलेला असतो. याठिकाणी चोख बंदोबस्तही ठेवलेला असतो.

Web Title: Thousands of devotees of Kalvavaita Kalbhairav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.