आष्टीत इज्तेमासाठी हजारोवर समाजबांधव

By Admin | Updated: March 4, 2017 00:19 IST2017-03-04T00:17:18+5:302017-03-04T00:19:26+5:30

आष्टी : सदभावना, सदाचार व शांततेचा संदेश देण्यासाठी जिल्हाभरातून आलेल्या हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून इज्तेमाहची सांगता झाली.

Thousands of devotees for Ijtema | आष्टीत इज्तेमासाठी हजारोवर समाजबांधव

आष्टीत इज्तेमासाठी हजारोवर समाजबांधव

आष्टी : सदभावना, सदाचार व शांततेचा संदेश देण्यासाठी जिल्हाभरातून आलेल्या हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून इज्तेमाहची सांगता झाली.
शहरातील खडकत रोडवर इज्तेमाहचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटोदा, केज, अंबाजोगाई, परळी, माजलगांव, धारूर, बीड, गेवराई, शिरूर या सर्व तालुक्यातील लाखो मुस्लिम बांधव उपस्थित होते. यावेळी मुस्लिम धर्मगुरूंनी उपस्थित मुस्लिम बांधवांना सखोल असे मार्गदर्शन केले. मानव जातीच्या उध्दारासाठी दुआ करण्यात आली. यावेळी या इज्तेमाहात दहा जणांचे विवाह लावण्यात आले.
या इज्तेमासाठी जिल्हाभरातून मुस्लिम बांधव आल्याने शहरातील सर्व रस्ते वाहनांनी फुलले होते. यावेळी वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी तीन हजार स्वयंसेवक कार्यरत होते.त्यामुळे वाहतूक सुरळीत होती.
इज्तेमाहमध्ये विविध दुकाने आल्याने याठिकाणी विविध वस्तू खरेदी करण्यासाठी सर्व समाजांनी हजेरी लावण्यात आली होती. (वार्ताहर)

Web Title: Thousands of devotees for Ijtema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.