शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

औरंगाबादेत एसटी महामंडळातील चालक-वाहक पदासाठी हजारो अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 17:13 IST

भरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी महामंडळातर्फे उमेदवारांना ई-मेल करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देऔरंगाबादेत एसटी महामंडळात २४० जागा उमेदवारांना मंडळाच्या ई-मेलची प्रतीक्षा

औरंगाबाद :  एस.टी. महामंडळाने भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात चालक-वाहक पदासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविले. १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. हजारो बेरोजगार उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज दाखल केले. राज्यातील १५ जिल्ह्यांसाठी राबविण्यात येत असलेली ही भरती प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने होत आहे. भरतीच्या पुढील प्रक्रियेसाठी महामंडळातर्फे उमेदवारांना ई-मेल करण्यात येणार आहे.

राज्यातील दुष्काळग्रस्त १५ जिल्ह्यांमधील युवक-युवतींसाठी ४ हजार २४२ पदांची भरती करण्यात येत आहे. भरती औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे या पंधरा जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे. ११ जिल्ह्यांत ४ हजार २४२ पदांच्या जागा आहेत. बीड,लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्यांत चालक तथा वाहक पदांच्या रिक्त जागा नाहीत.

दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील युवकांना काम देण्यासाठी पात्र उमेदवारांची निवड करून रिक्त जागांवर इतर जिल्ह्यांत नियुक्ती देण्यात येईल. एकाच दिवशी चालक तथा वाहक पदाच्या परीक्षा संबंधित जिल्ह्यात घेतल्या जातील. या भरतीमध्ये इतर आरक्षणाबरोबर मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णयही एस.टी महामंडळाने घेतला आहे.

अर्ज भरण्यासाठी तारेवरची कसरतएस.टी. महामंडळाने आॅनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले होते. इच्छुक उमेदवारांनी विविध कागदपत्रे अपलोड करणे, बँकेचा धनादेश लावणे आदी कामे आॅनलाईन पद्धतीने केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. औरंगाबाद जिल्ह्यातील २४० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 

स्मार्ट सिटी प्रकल्पात घेणारमराठा आरक्षणाचे निकष भरतीसाठी लावण्यात आले आहेत. आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहेत. भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांना एस.टी.महामंडळात सामावून घेता आले नाही, तर औरंगाबाद शहरात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील बस सेवेत १५ हजार रुपयांच्या कंत्राटी पद्धतीवर घेण्यात येणार आहे.

शुल्कात सवलत दुष्काळग्रस्त भागातील अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय तसेच दुष्काळग्रस्त उमेदवारांना परीक्षा शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात आली. उमेदवारांची नंतर १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज किती आले याचा आकडा मुंबई कार्यालयाला माहीत असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :state transportएसटीEmployeeकर्मचारीAurangabadऔरंगाबाद