शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

"जे स्वतःला 'शेर' म्हणायचे, ते आता पळ काढत आहेत"; शिरसाटांचा जलील यांच्यावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 17:08 IST

एमआयएमच्या रॅलीत राडा झाल्यानंतर शिरसाट-जलील यांच्यात 'वाकयुद्ध'

छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला हिंसक वळण लागल्यानंतर आता शहरातील दिग्गज नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या रॅलीत झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नावर प्रतिक्रिया देताना शिंदेसेनेचे प्रवक्ता तसेच मंत्री संजय शिरसाट यांनी जलील यांच्यावर सडकून टीका केली आहे. "जलील यांनी पैसे घेऊन तिकीट वाटल्यामुळे त्यांचेच कार्यकर्ते संतापले आहेत. त्यांनी केलेले पापच त्यांना भोगावे लागत आहे," असा टोला शिरसाट यांनी लगावला.

बायजीपूरा भागात एमआयएमच्या उमेदवारांसाठी जलील यांची रॅली सुरू असताना काही तरुणांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आणि त्यांच्या गाडीवर चाल करून जाण्याचा प्रयत्न केला. यावरून इम्तियाज जलील यांनी आक्रमक पवित्रा घेत हा हल्ला मंत्री अतुल सावे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गुंडांनी केल्याचा आरोप केला आहे. "आम्ही गप्प बसणारे नाही, पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दिले आहे, त्यांनी त्यांचे काम करावे," असे जलील यांनी म्हटले आहे.

शिरसाटांचा पलटवार, 'जैसी करनी वैसी भरनी'

जलील यांच्या आरोपांना उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले की, "आम्हाला यांच्यावर हल्ला करण्याची अजिबात गरज नाही. जलील एक नंबरचे खोटरडे आहेत. जे स्वतःला 'शेर' म्हणायचे, ते आता पळ काढत आहेत. ओवेसी सोबत आहेत म्हणून कोणी आपले काही करू शकत नाही, हा त्यांचा गर्व आज जनतेने उतरवला आहे."

स्वतःवरच हल्ला करून घेतलाया घटनेनंतर पोलिसांनी बायजीपूरा परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. काँग्रेसचे उमेदवार कलीम कुरेशी यांनीही या वादात उडी घेत जलील यांनी सहानभूती मिळावी म्हणून स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा दावा केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shirsat attacks Jalil: Those calling themselves 'lions' are now fleeing.

Web Summary : Shirsat criticized Jalil after an attack during his rally, alleging ticket selling led to public anger. Jalil accused Shirsat's supporters. Shirsat denied involvement, calling Jalil a liar. Congress alleged Jalil staged the attack for sympathy.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६Sanjay Shirsatसंजय शिरसाटImtiaz Jalilइम्तियाज जलील