छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्यात वनक्षेत्रात वणव्यांचे प्रमाण वाढते. वनक्षेत्रात निष्काळजीपणे आग प्रज्ज्वलित केल्यास, डोंगरालगत पेटती सिगारेट फेकल्यास भडकलेली आग हजारो हेक्टर वनसंपदा खाक करू शकते. आग लावून वनसंपत्तीचे नुकसान केल्यास होणारा दंड व सहा महिने ते एक वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. वनक्षेत्रात आग लावणाऱ्यांना जेलची हवा खावी लागणार आहे. उन्हाळ्यात वाळलेल्या गवताला आग लावणाऱ्यांची वन विभाग खैर करणार नाही.
जिल्ह्यात १६ हजार हेक्टरवर जाळरेषाडोंगर व परिसरात हजारो हेक्टरवर फट्टे जाळरेषा पाडून आग पसरू नये म्हणून उन्हाळा सुरू झाला की, वन मजुरांमार्फत जाळरेषा मारण्याचे काम केले जाते.
जाळरेषा यासाठी महत्त्वाची...वाळलेल्या गवताला चुकून आग लागल्यास ती पसरू नव्हे म्हणून जाळरेषा मारण्यात आलेल्या असतात. त्या आगीला रोखण्याचेच काम ती करते. पथक येईपर्यंत महत्त्वाचा दुवा जाळरेषा मानली जाते.
गौताळा, सारोळ्यात जैवविविधता...आग लागल्यास वन्यजीव जैवविविधता नष्ट होते, अनेक वनस्पती जळून जातात. साप, ससे, तितर व इतर पक्ष्यांची अंडी, घरटी, पिल्लांची जळून राख होते. त्यामुळे वन विभागाकडून आगीला प्रामुख्याने रोखण्याचा प्रयत्न केला जातो. शासनाने त्यांना आधुनिक साधनेही दिलेली असून, त्याचा उपयोग केला पाहिजे.
वनक्षेत्र का महत्त्वाचे?पर्यावरण राखण्यासाठी वनक्षेत्रातील जैवविविधता जपणे गरजेचे असून, ऑक्सिजन ही महत्त्वाची निर्मिती वनक्षेत्रातूनच तुम्हाला मिळते. त्यामुळे आरोग्य आणि जैवविविधता टिकवण्याचे काम वनक्षेत्र करत असते.
जंगलाला आग लागण्याची प्रमुख कारणे...निसर्ग भ्रमंती करण्यासाठी वन विभागाची परवानगी घ्यावी तसेच ज्वलनशील कोणत्याही वस्तू सोबत घेऊन जाऊ नये, अशा विविध सूचना दिल्या जातात. वनक्षेत्रातून अनेक रस्ते गेलेले असून, सिगारेट, बिडी टाकल्याने किंवा ज्वलनशील वस्तू वापरण्यानेही वन संपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडते. जंगलातील लाकडे पळविणे किंवा वन्यजीवांची शिकारही असू शकते.
वणवा लावणाऱ्यास कारावासाची तरतूदवणवा लावणाऱ्याला दंड आणि जेलची हवा खावी लागणार असून, वन विभागाकडून तशी तयारीही करण्यात आलेली आहे.
सतर्क राहण्याच्या दिल्या सूचना...आगीमुळे वनक्षेत्राचे नुकसान होऊ नये म्हणून सर्वांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जनावरे चारणारे, लाकूड तोडणारे व लपूनछपून पार्टी करणारे संशयास्पद दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.- सुवर्णा माने, उपवन संरक्षक, प्रादेशिक विभाग