‘त्या’ पिलांना सोमवारी पिंजऱ्यात सोडणार
By Admin | Updated: September 17, 2014 01:15 IST2014-09-17T00:34:33+5:302014-09-17T01:15:21+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील पांढऱ्या वाघिणीने दोन बछड्यांना जन्म दिला आहे.

‘त्या’ पिलांना सोमवारी पिंजऱ्यात सोडणार
औरंगाबाद : महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील पांढऱ्या वाघिणीने दोन बछड्यांना जन्म दिला आहे. दीड महिनाभरापूर्वीच या पिलांचा जन्म झाला आहे. त्या पिलांनी डोळे उघडले असून त्यांना येत्या सोमवारपर्यंत पिंजऱ्यात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी.एच. नाईकवाडे यांनी दिली. पिलांना दीड महिन्यापासून संंग्रहालयातील अतीव दक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. पिलांची काळजी घेतली जात असून, कुणालाही त्यांच्यापर्यंत जाऊ दिले जात नव्हते. मे महिन्यात पिवळ्या वाघाच्या ३ पिलांचा जन्म झाला होता. पिलांना संसर्ग होऊ नये यासाठी त्यांची काळजी घेण्यात आली. तीन महिन्यांत उद्यानामध्ये वाघांच्या ५ पिलांचा जन्म झाला आहे. त्यामध्ये तीन पिवळ्या वाघांचा व दोन पांढऱ्या वाघांचा समावेश आहे.