कृषिपंपांचे चौदाशे कोटी थकले
By Admin | Updated: December 4, 2014 00:27 IST2014-12-04T00:27:58+5:302014-12-04T00:27:58+5:30
औरंगाबाद : महावितरणचे औरंगाबाद झोनमध्ये कृषिपंपांच्या बिलापोटी शेतकऱ्यांकडे चौदाशे कोटी रुपये थकले आहेत

कृषिपंपांचे चौदाशे कोटी थकले
औरंगाबाद : महावितरणचे औरंगाबाद झोनमध्ये कृषिपंपांच्या बिलापोटी शेतकऱ्यांकडे चौदाशे कोटी रुपये थकले आहेत. सरकारने दुष्काळी भागात वीज बिल सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची घोषणा नोव्हेंबरमध्ये नेत्यांनी केली; पण अद्यापही वीज सवलतीचे आदेश महावितरणला दिले नाहीत. त्यामुळे वीज सवलतीपासून लाखो शेतकरी वंचित आहेत.
मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत आहेत. दुसरीकडे शासन नुसती घोषणा करून सुस्त आहे. सरकारने दुष्काळाशी नोटिफिकेशन न काढल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने राज्यातील दुष्काळी भागात वीज बिलात साडेतेहतीस टक्के सवलत जाहीर केली आहे; पण त्याचे आदेश अद्यापही महावितरणला देण्यात आले नाहीत. त्यामुळे सवलतीपासून शेतकरी वंचित आहेत. औरंगाबाद झोनमध्ये कृषिपंपांची संख्या ३०७२१५ आहे. या कृषिपंपधारकांकडे १ हजार ४५४ कोटी ४९ लाख ३१ हजार वीज बिल थकले आहे. त्यामध्ये औरंगाबाद रुरलमध्ये १११९.५५ कोटी, तर औरंगाबाद सर्कलमध्ये ८२0१0.३१ कोटी वीज बिल थकले आहे, असे एकूण २०२४३६ कृषिपंंपधारकांकडे ८३१२९.८६ लाख रुपये थकले आहेत.
जालना जिल्ह्यात १०४७७९ कृषिपंंपधारकांकडे ६२३१९.४५ लाख रुपये थकले आहेत. वीज बिल सवलतीच्या घोषणेची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.