शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

मराठवाडा तहानला; २५ लाख नागरिकांना टँकरचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 11:59 IST

विभागात सर्वाधिक पिण्याच्या पाण्याची टंचाई औरंगाबाद जिल्ह्यात आहे.

ठळक मुद्देटँकरचा आकडा १५०० च्या दिशेने १८५० विहिरींचे पाण्यासाठी अधिग्रहण

औरंगाबाद : मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा अतिशय भयावह जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कधी नव्हे एवढे टँकर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस विभागात सुरू असून, १३८७ टँकरने आठ जिल्ह्यांतील २५ लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. येणाऱ्या आठ दिवसांत १५०० च्या आसपास टँकरचा आकडा जाईल, असा अंदाज सूत्रांनी वर्तविला. १ हजार ५८ गावांत, ३४१ वाड्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सध्या आहे. 

विभागात सर्वाधिक पिण्याच्या पाण्याची टंचाई औरंगाबाद जिल्ह्यात आहे. १२ लाख ५६ हजार ८७० नागरिकांना पिण्याचे पाणी टँकरने पुरविले जात आहे. ३९९ विहिरी प्रशासनाने ताब्यात (अधिग्रहित) घेतल्या आहेत. त्याखालोखाल बीड जिल्ह्यात ६ लाख २८ हजार ६१ नागरिकांना  टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. ६०२ विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. त्यानंतर जालना जिल्ह्यातील ३ लाख ८५ हजार ६२१ गावांना टँकरने पाणी दिले जात आहे. ३०१ विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. सध्या १३२४ टँकर खाजगी कंत्राटदार संस्थांचे असून, उर्वरित ६३ टँकर शासकीय आहेत. मोठ्या प्रमाणात टँकर लॉबीवर प्रशासनाला अवलंबून राहावे लागते आहे. परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत टँकरची संख्या कमी असली तरी आगामी काळात ती वाढण्याची शक्यता आहे. 

विभागातील गावनिहाय सुरू असलेले टँकर व अधिग्रहित विहिरी : 

जिल्हा        लोकसंख्या                   गावे/वाड्या          टँकर    विहिरींचे अधिग्रहणऔरंगाबाद    १२ लाख ५६ हजार         ७०९                      ७०७           ३९९जालना         ३ लाख ८५ हजार           १८३                      २१९          ३०१परभणी        ७ हजार ४३८                    ०३                         ०३           ६२    हिंगोली        १८ हजार ७८९                  ०७                         ११           ३९    नांदेड           ३९ हजार ९२६                  २५                         १८          १७बीड              ६ लाख २८ हजार            ४२६                       ३९६          ६०२लातूर              १० हजार ४४०               ०३                          ०२          १२७उस्मानाबाद    ६२ हजार २३                 २३                           ३१          ३०३    एकूण        अंदाजे २५ लाख         १३९९                     १३८७          १८५० 

टॅग्स :Marathwadaमराठवाडाwater scarcityपाणी टंचाईWaterपाणी