गंगापुरात तृतीय पंथीयांचे संमेलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 00:32 IST2016-04-27T00:01:52+5:302016-04-27T00:32:01+5:30
गंगापूर : गंगापूर शहरातील ख्वाजा मोइजोद्दीन नान पाश मंगल कार्यालयात तृतीयपंथीयांच्या संमेलनास सोमवारी (दि.२५) सुरुवात झाली.

गंगापुरात तृतीय पंथीयांचे संमेलन सुरू
गंगापूर : गंगापूर शहरातील ख्वाजा मोइजोद्दीन नान पाश मंगल कार्यालयात तृतीयपंथीयांच्या संमेलनास सोमवारी (दि.२५) सुरुवात झाली.
महाराष्ट्रासह ,मध्यप्रदेश, गुजरात, झारखंड, मारवाड आदी राज्यांतील तृतीयपंथीयांनी सहभाग नोंदवला असून, हे संमेलन २८ एप्रिलपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती संमेलन अध्यक्ष सीमा गुरू खुर्शीद यांनी दिली.
पाच वर्षांपूर्वी गंगापूर तृतीयपंथी तालुका अध्यक्ष खुर्शीद नायक यांचे निधन झाले, तेव्हापासून हे पद रिक्त होते. या पदाची निवड व खुर्शीद नायक यांच्या स्मरणार्थ संमेलन घेण्यात आले. ६ राज्यांतील जवळपास १५० प्रतिनिधी उपस्थित झाले असून, या ठिकाणी यात्रेचे स्वरूप आले आहे . विशेष म्हणजे या सर्वांसाठी मंगल कार्यालय परिसरात स्वतंत्र स्वच्छताग्रह, स्नानगृह तयार करण्यात आले आहे. कार्यालयाला सर्व बाजूंनी कापडी कनात लावण्यात आली असून पुरुषांना प्रवेश बंद करण्यात आला आहे . २५ एप्रिल रोजी गंगापूर तालुका नायकपदी सर्वानुमते सीमा नायक यांची निवड करण्यात आली. सीमा नायक म्हणाल्या की, हे संमेलन समस्त मानवजातीच्या सुख-शांतीसाठी आहे. गेल्या पाच वर्षांपासून राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. लोकांच्या हाताला काम नाही, अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आत्महत्या करीत आहेत. पाप वाढले आहे म्हणून देवाचा कोप होत आहे. पाऊस पडून सर्वत्र आनंदमय वातावरण निर्माण व्हावे यासाठी देवाकडे सामूहिक रीत्या प्रार्थना करण्यात येणार आहे.