शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

मॅनहोलमध्ये गुदमरलेल्या तिसऱ्या शेतकऱ्याचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:58 IST

सुखना नदीपात्रातील ड्रेनेजलाईनच्या मॅनहोलमधून मोटारीने पाणी उपसा करण्याच्या प्रयत्नात सोमवारी दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू, तर अन्य चौघे अत्यवस्थ झाले होते. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांच्यापैकी उमेश कावडे (२८, रा. चिकलठाणा) यांचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. रामकिशन माने व प्रकाश वाघमारे यांची प्रकृती अजूनही अत्यवस्थ आहे

ठळक मुद्देसासरा कोमात : बेपत्ता जावयाचा दुसºया दिवशीही शोध सुरूच

औरंगाबाद : सुखना नदीपात्रातील ड्रेनेजलाईनच्या मॅनहोलमधून मोटारीने पाणी उपसा करण्याच्या प्रयत्नात सोमवारी दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू, तर अन्य चौघे अत्यवस्थ झाले होते. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांच्यापैकी उमेश कावडे (२८, रा. चिकलठाणा) यांचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. रामकिशन माने व प्रकाश वाघमारे यांची प्रकृती अजूनही अत्यवस्थ आहे. ड्रेनेजलाईनमध्ये बेपत्ता असलेल्या रामेश्वर डांबे यांचा दुसºया दिवशीही शोध लागला नाही.ब्रिजवाडी पॉवरलूम येथील कब्रस्थानानजीकच्या सुखना नदीपात्रातून वाहणाºया भूमिगत गटाराच्या मॅनहोलमध्ये उतरून त्यातून शेतीसाठी पाणी घेण्याच्या प्रयत्नात सोमवारी दोन शेतकºयांचा गुदमरून मृत्यू झाला होता. अत्यवस्थ असलेल्या चौघांपैकी उपचार सुरू असताना उमेश कावडे यांचे मंगळवारी निधन झाले. नवनाथ कावडे यांच्या प्रकृतीवरील धोका टळला असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. प्रकाश वाघमारे व रामकिसन माने यांच्यावर उपचार सुरू आहेत. जनार्दन साबळे, दिनेश दराखे हे सोमवारी घटनास्थळीच मृत पावले होते.सासºयाला वाचविताना बेपत्ता झालेल्याजावयाचा शोध सुरूचरामकिसन माने यांचे जावई रामेश्वर डांभे हे सासºयांना वाचविण्यासाठी चेम्बरमध्ये उतरले होते. ते कालपासून बेपत्ता असून, ते चेम्बरमधून वाहून गेले असावेत, अशी शक्यता आहे. मंगळवारी दुसºया दिवशीही रामेश्वर डांभेंच्या शोधार्थ अग्निशामक विभाग व मनपाची पथके कार्यरत होती. मंगळवारी रात्रीपर्यंत यंत्रणेला यश आलेले नाही.मोबाईल लोकेशन घेण्याची मागणीडांभेंच्या नातेवाईकांनी मोबाईलच्या लोकेशनवरून शोध घेण्याची विनंतीही पथकाकडे केली. घटनास्थळापासून तीन ठिकाणी पथकाने चेम्बर फोडण्याचा प्रयत्न केला. रखरखत्या उन्हातही अग्निशामक विभागाचे राजू सुरे व त्यांच्या कर्मचाºयांचे शोधकार्य सुरूच होते.धुळ्याहून आले पथकराष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे २७ जवानांचे पथक धुळ्याहून मंगळवारी सायंकाळी शहरात दाखल झाले असून, त्यांनी शोधकार्य सुरू केले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यू