तिसरे अपत्य; नगरसेविका चाऊस अपात्रच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:28 IST2017-09-26T00:28:16+5:302017-09-26T00:28:16+5:30
तिसरे अपत्य असल्याने बीड नगरपालिकेच्या प्रभाग क्र. ११ (अ)च्या नगरसेविका आर्शिया बेगम सईद चाऊस यांचे पद अपात्र ठरविले आहे.

तिसरे अपत्य; नगरसेविका चाऊस अपात्रच
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : तिसरे अपत्य असल्याने बीड नगरपालिकेच्या प्रभाग क्र. ११ (अ)च्या नगरसेविका आर्शिया बेगम सईद चाऊस यांचे पद अपात्र ठरविले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांनी सोमवारी निर्णय दिला. यामुळे काकू-नाना आघाडीला मोठा धक्का बसला असून, प्रभागातील जागा रिक्त झाली आहे.
बीड नगरपालिका निवडणुकीत काकू-नाना आघाडीकडून आर्शिया बेगम सईद चाऊस यांनी निवडणूक लढविली होती. जनतेने त्यांना निवडूनही दिले. याचवेळी तिसरे अपत्य असल्याने त्यांचे सदस्यत्व पद रद्द करावे, अशी याचिका फरिदा बेगम अफसर खान यांनी जिल्हाधिकाºयांकडे याचिका दाखल केली होती.
या प्रकरणी चार वेळा जिल्हाधिकाºयांनी सुनावणी केली; परंतु ठोस निर्णय दिला नव्हता. अखेर याचिकाकर्त्याने ठोस पुरावे जिल्हाधिकाºयांकडे सादर केल्याने आर्शिया बेगम सईद चाऊस यांना तीन अपत्ये असल्याचे सिद्ध झाले. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी २१ सप्टेंबर रोजी झालेल्या अंतिम सुनावणीत त्यांचे सदस्यत्व अपात्र असल्याचा निर्णय दिला. सोमवारी यासंदर्भात अधिकृत निर्णय घोषित केला. अधिकृत निर्णय घोषित न झाल्यामुळे गेली दोन दिवस नुसतीच चर्चा होती.
दरम्यान, प्रभाग क्र. ११ (अ) मधील जागा मागासवर्ग महिलांसाठी राखीव असून, ती रिक्त झाल्याचे जिल्हाधिकाºयांनी जाहीर केले आहे.