चोरट्यांची मारहाण; महिला गंभीर जखमी
By Admin | Updated: July 2, 2014 01:02 IST2014-07-02T00:50:08+5:302014-07-02T01:02:08+5:30
वाळूज महानगर : शेंदुरवादा परिसरातील नागापूर शेतवस्तीवर सोमवारच्या मध्यरात्री तीन चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली.

चोरट्यांची मारहाण; महिला गंभीर जखमी
वाळूज महानगर : शेंदुरवादा परिसरातील नागापूर शेतवस्तीवर सोमवारच्या मध्यरात्री तीन चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली. चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १३ हजारांचा ऐवज नेला.
वाळूज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संभाजी दादासाहेब नरवडे यांची नागापूर शिवारात शेती असून, ते कुटुंबासह तेथे राहतात.
मध्यरात्री दोनच्या सुमारास २० ते ३० वयोगटातील तीन अज्ञात चोरट्यांनी शेतवस्तीवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली. घरात झोपलेले लोक दार उघडत नसल्यामुळे त्यांनी दगडांनी दार तोडले व घरातील लोकांना मारहाण करण्याची धमकी देत २ सोन्याचे मंगळसूत्र, चांदीची अंगठी, मोबाईल फोन व रोख ५०० रुपये, असा १३ हजारांचा ऐवज ताब्यात घेतला. तपास पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार व्ही. एस. रणवीरकर करीत आहेत.
लाठ्या-काठ्यांचा वापर
भामाबाई बाबासाहेब नरवडे (४५) यांनी चोरट्यांना विरोध करताच तीन जण त्यांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करून निघून गेले. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात संभाजी नरवडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.