शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्र, रॉडसह मास्क घालून फिरणारे चोरटे छत्रपती संभाजीनगरात सक्रिय, तीन दिवसांत चार घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 12:25 IST

अपार्टमेंटमधील अन्य फ्लॅटचे दरवाजे बाहेरून लावून घेत रेकी, शहर हद्दीलगत देवळाई, खडी रोड परिसरात वाढला वावर

छत्रपती संभाजीनगर : गेल्या १५ दिवसांपासून तोंड झाकून फिरणाऱ्या शस्त्रधारी चोरांच्या टोळ्या शहरात रात्रभर चोरी, लुटमारी करत फिरत आहेत. प्रामुख्याने पिसादेवी, बीड बायपास, पडेगावसह वाळूज परिसरात यांचा वावर आढळला आहे. तीन दिवसांत दुकान फोडीसह घरफोडीच्या चार घटना उघडकीस आल्या असून सण, उत्सवात या टोळ्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

देवळाई परिसरात कारमधून आलेल्या चोरांनी मोठ्या टॉमीने दुकानाचे शटर उचकटवून तब्बल ४ लाख रुपयांचा सुकामेवा चोरून नेला. ही घटना ताजी असतानाच पडेगाव-मिटमिटा परिसरातील तारांगण कासलीवाल सोसायटीमधील ओमसाई प्रोव्हिजन दुकान चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री २:३० वाजता फोडण्याचा प्रयत्न केला. महेश बालकिसन पंचारिया यांचे ओमसाई प्रोव्हिजन नावाने किराणा दुकान आहे. दुकानाच्या वरच्या मजल्यावर ते राहतात. बुधवारी रात्री १०:३० वाजता दुकान बंद करून ते घरी गेले. सकाळी ७ वाजता मात्र दुकानाचे शटर उचकटलेले दिसले. चोरांनी मोठ्या पकडने कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आतील बाजूनेही कुलूप असल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. महिनाभरापूर्वी देखील याच परिसरातील सराफा व्यावसायिकाचे दुकान फोडले होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमधील सायरन वाजल्याने चोर पळून गेले. तिसऱ्या घटनेत पोलिस आयुक्तालयात कार्यरत एका पोलिस अंमलदाराचे घर फोडत लाखोंचा ऐवज लंपास झाला होता.

एकच पद्धत, एकच देहबोलीबीड बायपास, पडेगावसह पिसादेवी परिसरात झालेल्या घरफोडीत चोरांच्या हातातील टॉमी, गणवेश, रेनकोट परिधान करण्याची पद्धत एकच आहे. शिवाय, देवळाई, म्हस्के पेट्रोलपंप परिसरातील घटनांसह पडेगावमध्ये देखील चोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडले होते.

पिसादेवीतही किराणा दुकान लक्ष्यअनिल चव्हाण यांचे पिसादेवी परिसरातील श्रीकृष्ण रेसिडेन्सीमध्ये किराणा दुकान आहे. २ सप्टेंबर रोजी रात्रीतून दुकानाचे शटर उचकटून चोर आत घुसले. यात दीड लाख रुपयांचे किराणा सामान व इलेक्ट्रिक साहित्य चोरांनी लंपास केले.

बीड बायपासवर अपार्टमेंटमध्ये रेकीगेल्या दहा दिवसांत देवळाई, खडी रोड, माऊलीनगरसह म्हस्के पेट्रोलपंप परिसरात चोरांचा वावर वाढला आहे. रात्री १ वाजेनंतर अपार्टमेंटमध्ये हातात शस्त्रांसह घुसून घरफोडीसाठी रेकी करत फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी