शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

२४ तासांत चोरट्यांना उपरती; ९५ क्विंटल कापूस भरलेला ट्रक टोल नाक्यावर सोडून पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 20:21 IST

अजिंठा पोलिसांनी घेतला आयशर ताब्यात, आता चोरट्यांना पकडण्याचे आव्हान ...

सिल्लोड : तालुक्यातील गोळेगाव येथून शनिवारी सुमारे ९५ क्विंटल कापसाने भरलेला चोरीस गेलेला ट्रक रविवारी मध्यरात्री १.३० वाजता कन्नड तालुक्यातील हतनुर टोलनाक्यावर मिळून आला. ट्रक सोडून पसार झालेल्या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान अजिंठा पोलिसांना पेलायचे आहे.

सिल्लोडचे  उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विजय मराठे अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे यांच्या मार्गर्शनाखाली उपनिरीक्षक धम्मदीप काकडे, अली शेख,पोहेकॉ बाबा चव्हाण,रविंद्र बागुलकर यांनी सर्वत्र नका बंदी लावली होती  सिल्लोड, पालोद, अजिंठा, भराडी, फुलंब्री, व जागो जागी असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले जात होते. इतक्यात अजिंठा पोलिसांना तो चोरी गेलेला आयशर हतनूर जवळ आलेल्या टोल नाक्यावर उभा असल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तो आयशर ताब्यात घेतला.

चोरीचा आयशर पकडला गेला  त्यातील कापूस असलेला मुद्देमाल मिळाला असला तरी अजून यातील चोरटे पसार आहे.त्या चोरट्याना पकडण्याचे जिकरीचे काम पोलिसांना करायचे आहे.ते चोरटे कोण ...त्यांनी हा आयशर चोरला खरा पण तो रस्त्यात सोडून ते का पसार झाले तो कापूस कुणाला विकला जाणार होता याचा शोध होणे महत्वाचे आहे.

सिल्लोड तालुक्यातील पानवडोद येथील राजेद्र तुकाराम दौड यांच्या मालकीचा विटकरी रंगाचा आयशर ट्रक (एमएच २१ बीएच ३०२४ ) शनिवारी गोळेगाव येथून चोरीला गेला होता. त्यात शेतकऱ्यांचा जवळपास  ७ लाख ६६ हजार रुपये किमतीचा ९५ क्विंटल कापूस होता. कापूस सिल्लोड येथील जिनिंगमध्ये विक्रीसाठी नेत असताना चालकाने ट्रक औरंगाबाद जळगाव महामार्गावरील आदित्य पेट्रोल पंपावर रात्री ८ वाजेच्या सुमारास उभा केला. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी ट्रक पळवला. रविवारी सकाळी ही घटना समोर आली होती. त्यानंतर मालक तुकाराम दौड यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ७ लाख ६६२०० रुपयाचा कापूस व १५ लाखाचा ट्रक असा एकूण २२ लाख ६६२०० रुपयाचा मुद्देमाल चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तो ट्रक हतनूर टोलनाक्यावर आढळून आला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद