लासूर स्टेशन येथे व्यापाऱ्याच्या घरी चोरी, लाखोचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 13:47 IST2018-02-20T13:45:19+5:302018-02-20T13:47:01+5:30
लासूर स्टेशन येथील व्यापारी विनोद जाजू यांच्या राहत्या घरी आज पहाटे तीन वाजेच्या दरम्यान चोरी झाली.

लासूर स्टेशन येथे व्यापाऱ्याच्या घरी चोरी, लाखोचा ऐवज लंपास
औरंगाबाद : लासूर स्टेशन येथील व्यापारी विनोद जाजू यांच्या राहत्या घरी आज पहाटे तीन वाजेच्या दरम्यान चोरी झाली. चोरट्यांनी जाजू कुटुंबियांना मारहाण करत रोख रक्कम व सोन्याचांदीचा लाखोचा ऐवज लुटला.
या बाबत अधिक माहिती अशी कि, लासूर स्टेशन येथील आडत व्यापारी विनोद जाजू यांचे गणपती गल्ली येथे घर आहे. सोमवारी रात्री ते कुटुंबीयांसह गहरी झोपले होते. पहाटे तीन वाजेच्या दरम्यान दोन चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी जाजू पती पत्नीला जबर मारहाण करत सोन-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लुटून पोबारा केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ते पुढील तपास करत आहेत.
दरम्यान आज सकाळी ही घटना कळताच नागरिकांनी जाजू यांच्या घरी गर्दी केली. तसेच पोलिसांच्या दुर्लक्षाने गावातील चोरीच्या घटना वाढल्या आहेत असा आरोप करत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.