तीन ठिकाणी चोऱ्या
By Admin | Updated: July 5, 2017 00:24 IST2017-07-05T00:22:46+5:302017-07-05T00:24:33+5:30
कोळगाव : तिंतरवणी येथे सोमवारी एकाच रात्री तीन चोऱ्या झाल्या.

तीन ठिकाणी चोऱ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
कोळगाव : तिंतरवणी येथे सोमवारी एकाच रात्री तीन चोऱ्या झाल्या.
डीसीसी बँकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. मात्र, ग्रामस्थांच्या जागृतीमुळे चोरटे पळाले. त्याच्या दोन तासानंतर येथील डॉ. किसन खेडकर यांचे घर फोडले. तसेच फुलसांगवी येथील संत वामनभाऊ मंदिारातील दानपेटी फोडून चोरट्यांनी सव्वा लाखांची रोकड लंपास केली. या घटना सोमवारी रात्री घडल्या. याप्रकरणी चकलंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपासून चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोऱ्यांचा तपास लावण्याचे मोठे आव्हान चकलंबा पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवून चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने केली जात आहे.