विविध ठिकाणांहून चोरट्यांनी पळविल्या ४ दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:20 IST2021-02-05T04:20:51+5:302021-02-05T04:20:51+5:30

इम्रान खान उमर खान (२५, रा. गणेश कॉलनी) यांनी २४ जानेवारीला दुपारी साडेबाराच्या सुमारास प्रोझोन मॉलसमोरील पार्किंगमध्ये त्यांची मोटारसायकल ...

Thieves stole 4 two-wheelers from various places | विविध ठिकाणांहून चोरट्यांनी पळविल्या ४ दुचाकी

विविध ठिकाणांहून चोरट्यांनी पळविल्या ४ दुचाकी

इम्रान खान उमर खान (२५, रा. गणेश कॉलनी) यांनी २४ जानेवारीला दुपारी साडेबाराच्या सुमारास प्रोझोन मॉलसमोरील पार्किंगमध्ये त्यांची मोटारसायकल उभी केली होती. यानंतर कामावर गेले होते. चोरट्यांनी त्यांची दुचाकी (एमएच २० बीआर ८१८०) लांबवली. दुसऱ्या घटनेत विकास रामदास करपे (२३, रा. रामेश्वरनगर, हर्सूल) यांची मोटारसायकल (एमएच २० ईझेड ३५९९) २४ जानेवारीला सकाळी ११ वाजेच्या सुमारास चेलीपुरा येथील एका प्रार्थनास्थळाजवळून चोरट्यांनी नेली. हा प्रकार समोर येताच करपे यांनी सिटी चौक ठाण्यात धाव घेतली. जळगाव रस्त्यालगतच्या भाजीमंडी येथे झालेल्या अन्य एका घटनेत चोरट्यांनी दीपक माणिकराव भाकरे (३८, रा. राजे संभाजीनगर, पिसादेवी रोड) यांची मोटारसायकल (एमएच २० डीएल ६५४८) २३ जानेवारी रोजी सायंकाळी ६:३० ते ७ वाजेच्या सुमारास हडकोतील नूतन बहुउद्देशीय शाळेच्या भिंतीजवळून चोरी झाली. याविषयी त्यांनी सिटी चौक ठाण्यात फिर्याद नोंदविली. खोकडपुरा, सब्जीमंडीतील रहिवासी मोहम्मद जावेद नूर मोहम्मद बागवान (३५, रा. सब्जीमंडी, खोकडपुरा) यांची मोटारसायकल (एमएच २० सीजी ०१२८) नवा मोंढा जाधववाडी येथून चोरट्यांनी पळविली. २५ जानेवारी रोजी सकाळी ही घटना झाली. त्यांनी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली.

Web Title: Thieves stole 4 two-wheelers from various places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.