दुचाकीस्वार शिक्षिकेचे मिनी गंठण चोरट्यांनी हिसकावले

By | Updated: November 26, 2020 04:12 IST2020-11-26T04:12:50+5:302020-11-26T04:12:50+5:30

तक्रारदार किरण विठ्ठल राणे या त्यांच्या बाळाला सोबत घेऊन रविवारी दुपारी बहिणीसोबत दुचाकी घेऊन शहरात आल्या होत्या. बाजारात खरेदी ...

Thieves snatched the mini knot of a two-wheeler teacher | दुचाकीस्वार शिक्षिकेचे मिनी गंठण चोरट्यांनी हिसकावले

दुचाकीस्वार शिक्षिकेचे मिनी गंठण चोरट्यांनी हिसकावले

तक्रारदार किरण विठ्ठल राणे या त्यांच्या बाळाला सोबत घेऊन रविवारी दुपारी बहिणीसोबत दुचाकी घेऊन शहरात आल्या होत्या. बाजारात खरेदी करून त्या परत घरी जात असतांना पैठण रोडवरील नाथ सीडसमोर रस्त्यावर गतिरोधक असल्यामुळे त्या हळू जात होत्या. यावेळी अचानक मागून आलेल्या दुचाकीस्वार दोन चोरट्यांपैकी मागे बसलेल्या एकाने किरण यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून तोडून घेतले. यानंतर चोरटे सुसाट निघाले. हा प्रकार लक्षात येताच किरण आणि त्यांच्या बहिणीने स्कुटीने त्यांचा पाठलाग केला. मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेनंतर किरण यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक मारूती दासरे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा तपास उपनिरीक्षक शिरसाट करीत आहेत.

Web Title: Thieves snatched the mini knot of a two-wheeler teacher