वेगवेगळ्या ठिकाणाहून ५ दुचाकी चोरट्यांनी पळविल्या

By | Updated: December 6, 2020 04:00 IST2020-12-06T04:00:58+5:302020-12-06T04:00:58+5:30

सिल्लेखाना येथील अमीर कुरेशी हुसेन कुरेशी यांची दुचाकी (एम एच २० ईआर २७८१) गल्लीतून चोरट्यांनी नेली. १ डिसेंबरच्या रात्री ...

Thieves snatched 5 two-wheelers from different places | वेगवेगळ्या ठिकाणाहून ५ दुचाकी चोरट्यांनी पळविल्या

वेगवेगळ्या ठिकाणाहून ५ दुचाकी चोरट्यांनी पळविल्या

सिल्लेखाना येथील अमीर कुरेशी हुसेन कुरेशी यांची दुचाकी (एम एच २० ईआर २७८१) गल्लीतून चोरट्यांनी नेली. १ डिसेंबरच्या रात्री ही चोरी झाली. त्यांनी क्रांतीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली.

दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी सिडको ते एपीआय कॉर्नर रस्ता येथे बॅंकेसमोर उभी मोटारसायकल (एम एच २० बीपी ३७५७) ४ डिसेंबर रोजी भरदिवसा पळविली. मोहम्मद मनतेज्जीबुद्दीन यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. तिसऱ्या घटनेत चोरट्यांनी मार्तंडनगर येथील अनिल आसाराम शिंदे यांची मोटारसायकल (एम एच २० एफ डी ६८८४) पळविली. शिंदे यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. अन्य एका घटनेत २ नोव्हेंबर रोजी रात्री काझी माजीद काझी जुबेर (रा. उस्मानाबाद) यांची मोटारसायकल (एम एच २३ एझेड ५४३४) घाटी रुग्णालयाच्या आवारातून चोरी झाली. त्यांनी बेगमपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. पाचव्या घटनेत सिडकोतील कॅनॉट मार्केटमधील दालनासमोर उभी मोटारसायकल (एम एच २० एफए ०८९८)१ डिसेंबर रोजी भरदिवसा चोरट्यांनी नेली. याप्रकरणी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली.

Web Title: Thieves snatched 5 two-wheelers from different places