सालेवडगावात चोरांचा धुमाकूळ

By Admin | Updated: January 10, 2017 23:54 IST2017-01-10T23:47:05+5:302017-01-10T23:54:42+5:30

कडा / अंभोरा : आष्टी तालुक्यातील सालेवडगाव येथे सोमवारी मध्यरात्री चोरांनी मारहाण करून २ लाख १७ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला.

The thieves of Salvaggaon | सालेवडगावात चोरांचा धुमाकूळ

सालेवडगावात चोरांचा धुमाकूळ

कडा / अंभोरा : आष्टी तालुक्यातील सालेवडगाव येथे सोमवारी मध्यरात्री चोरांनी मारहाण करून २ लाख १७ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. रात्रीतून चार ठिकाणी चोरी केल्याने भीतीचे वातावरण आहे.
विठ्ठल कराळे, मोहन विधाते, अर्जून डोके, पारूबाई तनपुरे यांच्या घरात धुमाकूळ घालून चोरांनी चाकू, लाकडी काठी व गज अशा शस्त्रांचा धाक दाखवून ऐवज पळविला. मारहाणीत या चौघांसह गणेश डोके, कोमल डोके, सोमनाथ दहातोंडे हे तिघे जखमी झाले. अंभोरा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, परिसरात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)

Web Title: The thieves of Salvaggaon