पाटोद्यात चोरांचा धुमाकूळ

By Admin | Updated: May 10, 2015 00:20 IST2015-05-10T00:02:13+5:302015-05-10T00:20:24+5:30

पाटोदा : शहरात शनिवारी रात्री चोरांनी धुमाकूळ घालत हजारोंचा माल लंपास केला. दोन किराणा दुकान व एक हॉटेलात हात साफ केला शिवाय सराफा दुकान फोडण्याचाही प्रयत्न झाला.

Thieves in Patdi | पाटोद्यात चोरांचा धुमाकूळ

पाटोद्यात चोरांचा धुमाकूळ


पाटोदा : शहरात शनिवारी रात्री चोरांनी धुमाकूळ घालत हजारोंचा माल लंपास केला. दोन किराणा दुकान व एक हॉटेलात हात साफ केला शिवाय सराफा दुकान फोडण्याचाही प्रयत्न झाला.
बसस्थानकासमोर शरद बामदळे यांचे यश पॅलेस नावाचे हॉटेल आहे. मध्यरात्री चोरांनी शटर उचकवून २२ हजार रुपये लांबविले. जयमल्हार किराणा या किंचक शिंदे यांच्या दुकानातून दहा हजारांची रक्कम लांबविली. त्यानंतर चोरांनी मिठूलाल कांकरिया यांच्या किराणा दुकानाकडे मोर्चा वळविला. १० हजार रुपयांचा माल घेऊन चोरांनी तेथून धूम ठोकली. भागवत बामदळे यांच्या आर्या ज्वेलर्समध्येही चोरीचा प्रयत्न झाला. मात्र, शटर उचकविण्यात त्यांना अपयश आले. प्रयत्न अयशस्वी झाल्याने दागिने वाचले.
दरम्यान, शहरात चोरांनी धुमाकूळ घातल्याने व्यापाऱ्यांत भीती निर्माण झाली आहे. (वार्ताहर)

Web Title: Thieves in Patdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.