चोरट्यांनी पळविला ११ हजारांचा मुद्देमाल

By Admin | Updated: September 26, 2016 00:00 IST2016-09-25T23:50:36+5:302016-09-26T00:00:43+5:30

उस्मानाबाद : शहरातील तेरणा महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कमेसह संसारोपयोगी साहित्य असा ११ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला़

The thieves escaped with 11 thousand pieces | चोरट्यांनी पळविला ११ हजारांचा मुद्देमाल

चोरट्यांनी पळविला ११ हजारांचा मुद्देमाल

उस्मानाबाद : शहरातील तेरणा महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कमेसह संसारोपयोगी साहित्य असा ११ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला़ ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली असून, या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद शहरातील तेरणा महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस अविनाश सुभाष झोंबाडे हे राहतात़ चोरट्यांनी शनिवारी रात्रीच्या सुमारास अविनाश झोंबाडे यांचे घर फोडून आतील गॅस सिलेंडर, सौर ऊर्जेची बॅटरी, कपाटातील रोख सात हजार रूपये असा एकूण ११ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ याबाबत अविनाश झोंबाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे़ तपास हवालदार चव्हाण हे करीत आहेत़

Web Title: The thieves escaped with 11 thousand pieces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.