दुष्काळाने उपसरपंचाला बनविले चोर

By Admin | Updated: June 23, 2016 01:39 IST2016-06-23T01:03:37+5:302016-06-23T01:39:55+5:30

औरंगाबाद : यंदाच्या दुष्काळाने बळीराजाला नको नको ते करायला भाग पाडले. अनेक बागायदारांना मजुरीला जाण्याची वेळ आणली, शेतमजुरांना भीक मागण्याची वेळ आणली,

Thieves created by the tail of the sub-district | दुष्काळाने उपसरपंचाला बनविले चोर

दुष्काळाने उपसरपंचाला बनविले चोर


औरंगाबाद : यंदाच्या दुष्काळाने बळीराजाला नको नको ते करायला भाग पाडले. अनेक बागायदारांना मजुरीला जाण्याची वेळ आणली, शेतमजुरांना भीक मागण्याची वेळ आणली, काही शेतकऱ्यांना तर मृत्यूला कवटाळणे भाग पडले... याच दुष्काळामुळे वैजापूर तालुक्यातील शिरसगावच्या अशाच एका माजी उपसरपंच राहिलेल्या प्रतिष्ठित शेतकऱ्याला कर्जबाजारी परिस्थितीने चक्क चोर बनावे लागले...
राजेंद्र साहेबराव डुसिंग (४८, रा. शिरसगाव) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ग्रामसेवकाच्या घरात घुसून जबरी चोरी केल्याच्या गुन्ह्यात सायबर क्राईमच्या पथकाने त्यांना अटक केली. त्याचे झाले असे की, वाळूज परिसरातील शिवराई येथील सुरेखा कुंजर या १७ जून रोजी दुपारी आपल्या घरात बसलेल्या होत्या. अचानक हेल्मेट परिधान केलेला एक व्यक्ती मोटारसायकलवर त्यांच्या घरासमोर आला. मोटारसायकल उभी करून तो घरात आला. आत येताच ‘काय वहिनी ओळखले का?’ असे म्हणत त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. त्यावर हेल्मेट असल्यामुळे सुरेखा कुंजर यांनी त्यांना ओळखले नाही; परंतु पाणी आणून दिले. घरात कुणी नसल्याची संधी साधून ‘त्या’ हेल्मेटधारीने चाकू काढला आणि ‘गप्प बसा, आरडाओरड केली तर ठार मारीन’ अशी धमकी देऊन कुंजर यांच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे गंठण हिसकावून घेतले. तसेच घरात असलेला मोबाईल व एक हजार रुपयेही लुटले आणि क्षणभरात ही लूट करून मोटारसायकलवर पसार झाला. भरदिवसा घडलेल्या लुटमारीच्या या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या जबरी चोरीप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात हेल्मेटधारीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.
तांत्रिक पुराव्याआधारे पोलिसांना सापडला माग...
या घटनेत मोबाईल चोरीस गेला होता. त्यामुळे सायबर क्राईमचे सहायक निरीक्षक गजानन कल्याणकर, उन्मेष थिटे, फौजदार आंधळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तांत्रिक बाबीने या गुन्ह्यातील आरोपीचा शोध सुरू केला. अखेर हा गुन्हा शिरसगावातील माजी उपसरपंच असलेल्या राजेंद्र डुसिंग या शेतकऱ्याने केल्याची पक्की माहिती आणि पुरावे पोलिसांना सापडले. त्यारून सायबर क्राईमचे पथक काल आरोपी राजेंद्रपर्यंत पोहोचले. पोलिसांनी त्यांस अटक केली. अटकेनंतर लगेच आरोपीने ‘होय, साहेब परिस्थितीमुळे मी हा गुन्हा केला’ अशा स्पष्ट शब्दात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून चोरीचे गंठण, मोबाईल व गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकलही पोलिसांनी जप्त केली.
उसने पैसे आणण्यासाठी गेलो अन्...
वास्तविक पाहता आपण कुंजर यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने गेलोच नव्हतो. उसने पैसे मागण्याच्या उद्देशाने गेलो होतो, असे आरोपी राजेंद्र डुसिंग यांनी पोलिसांना सांगितले. डुसिंग हे उपसरपंच असताना सुरेखा कुंजर यांच्या घरचे शिरसगावला ग्रामसेवक होते. त्यामुळे कुंजर आणि डुसिंग यांची चांगली ओळख होती. हलाखीच्या परिस्थितीत कुंजर आपल्याला काही आर्थिक मदत करू शकतात, असे वाटल्याने आपण उसने पैसे मागण्याच्या (पान २ वर)

Web Title: Thieves created by the tail of the sub-district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.