शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कारमधून चोर आले, सीसीटीव्ही फोडून दुकानातील लाखों रुपयांचा ४०० किलो सुकामेवा लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 19:53 IST

देवळाई रोडवर चोरीची घटना; अन्य सामान सोडून केवळ महागडे पदार्थच ढापले

छत्रपती संभाजीनगर : देवळाई परिसरात कारमधून आलेल्या चोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडत किराणा दुकानाचे शटर उचकटून चार लाख रुपयांचा सुकामेवा, खजुराची पाकिटे लंपास केली. सोमवारी उघडकीस आलेल्या घटनेत सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुकानमालक मोहम्मद जाकीर ठेकिया ३१ ऑगस्ट रोजी रात्री त्यांचे हे दुकान बंद करून घरी गेले होते. सोमवारी सकाळी दुकानाचे शटर उचकटलेेले होते. १५ हजारांच्या रोख रकमेसह सुकामेवा गायब होता. साताऱ्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केली.

महागड्या साहित्यावरच डोळा२० किलो बदाम, ५० किलो काजू, ५० किलो अंजिर, ५० किलो पिस्ता, ३० किलो सुटे बदाम, २० किलो मखाणा, ५० किलो मनुका, १० किलो अक्रोड, २५ किलो काजू, ५० किलो काळ्या मनुका, २५ किलो पेंडखजूर, सिगारेटची पाकिटे व १५ हजार रोख रक्कम चोरीला गेली.

सेंट्रल लॉकही तोडले; कारमधून साहित्य नेलेचोरांची टोळी कारमधून आल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले. दुकानाच्या शटरला मोठ्या आकाराचे सेंट्रल लॉक असतानाही चोरांनी मोठ्या आकाराच्या पहाऱ्याने (रॉड) मधोमध शटर उचकटवले. दुकान फोडण्यापूर्वी त्यांनी रेकी केल्याचा संशय पोलिसांना आहे. कसोशीने तपास सुरू असल्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी