हडको परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

By Admin | Updated: August 25, 2014 00:24 IST2014-08-25T00:12:23+5:302014-08-25T00:24:21+5:30

औरंगाबाद : शनिवारी मध्यरात्री हडको एन-११ भागात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला.

The thieves in the area of ​​Hudko | हडको परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

हडको परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

औरंगाबाद : शनिवारी मध्यरात्री हडको एन-११ भागात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. एकाच रात्री आसपासची तीन घरे फोडून चोरट्यांनी सुमारे दीड लाखाचा ऐवज पळविला. परिसरात वाढलेल्या चोऱ्या, घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
घटनांबाबत मिळालेली माहिती अशी की, एन-११ परिसरातील गजानननगरातील रहिवासी माणिकचंद चुडीवाल हे शुक्रवारी कुटुंबासह नाशिकला गेले होते. त्यांच्या घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. घराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरला. आज पहाटे चुडीवाल गावाहून परत आले. तेव्हा दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला, कपाटातील दीड लाखाचा ऐवज गायब असल्याचे त्यांच्या नजरेस पडले.
चोरीची दुसरी घटना चुडीवाल यांच्या घराजवळच असलेल्या राजू लक्ष्मण काळोत्रे यांच्या घरी घडली. काळोत्रे हे शुक्रवारी रात्री गावी गेले होते. काल रात्री चोरट्यांनी त्यांचे घर फोडून सुमारे पंधरा हजारांचा ऐवज चोरून नेला. याशिवाय याच परिसरातील अन्य एक घरही चोरट्यांनी फोडले. या चोरीप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाता जाता चहा करून पिले चोरटे!
गजानननगरातील माणिकचंद चुडीवाल यांच्या घरात चोरी केल्यानंतर जाता जाता चोरट्यांनी त्यांच्या घरात चक्क गॅसवर चहा करून पिला. पत्तीचा व साखरेचा डबा चोरट्यांनी शोधून काढला. मग गॅसवर चहा केला आणि चहा पिल्यानंतर तरतरी येताच चोरटे पुढे निघून गेले.

Web Title: The thieves in the area of ​​Hudko

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.