घर साफ करणाºया डॉक्टर तरुणीने मावशीचा बंगलाही विकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:06 IST2017-07-29T01:06:40+5:302017-07-29T01:06:40+5:30

औरंगाबाद : अमेरिकेत राहणाºया मावशी आणि कॅन्सरतज्ज्ञ काकाच्या घरातून पाच लाख रुपये, सोन्या-चांदीचे दागिने, कारसह किमती ऐवज चोरून नेणाºया शिकाऊ डॉक्टर तरुणीने मावशीचा एन-४ येथील अलिशान बंगला विक्री केल्याची माहिती समोर आली आहे

Thieft trainee lady doctor sales aunt's bunglow secretly | घर साफ करणाºया डॉक्टर तरुणीने मावशीचा बंगलाही विकला

घर साफ करणाºया डॉक्टर तरुणीने मावशीचा बंगलाही विकला

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अमेरिकेत राहणाºया मावशी आणि कॅन्सरतज्ज्ञ काकाच्या घरातून पाच लाख रुपये, सोन्या-चांदीचे दागिने, कारसह किमती ऐवज चोरून नेणाºया शिकाऊ डॉक्टर तरुणीने मावशीचा एन-४ येथील अलिशान बंगला विक्री केल्याची माहिती समोर आली आहे. बंगला खरेदी करणाºयाने बंगल्याच्या प्रवेशद्वारावर त्याच्या नावाचा फलक लावला आहे.
याविषयी अधिक माहिती देताना मुकुंदवाडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे म्हणाले की, कॅन्सरतज्ज्ञ डॉक्टर शिवाजी गुणाले हे पत्नी वत्सला यांच्यासह अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. वत्सला या बहिणीची मुलगी सुकेशिनी येरमे हिच्याकडे बंगला, कार आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह किमती ऐवज सोपवून अमेरिकेत बिनधास्त होत्या. एमबीबीएसचे शिक्षण घेणाºया सुकेशिनी हिने काही दिवसांपूर्वी त्यांचा सिडको एन-४ येथील अलिशान बंगला बंब नावाच्या व्यक्तीला विक्री केला.
कोट्यवधीचा हा बंगला विक्री केल्यानंतर ती आणि त्यांचा वाहनचालक राजू माटे हे १० जुलैपासून घरातील किमती सामान, कार, मोपेड आणि दागिने, रोख पाच लाखा रुपयांसह पसार झाले. या चोरीप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात २७ जुलै रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करीत असताना डॉक्टर तरुणीने वत्सला यांच्या नावे असलेला बंगला विक्री केल्याची माहिती समोर आली.
बंगला खरेदी करणाºया बंब नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी या व्यवहाराची कागदपत्रे घेऊन बोलावले आहे. हा बंगला वत्सला यांच्या परस्पर कसा काय विक्री केला, याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Web Title: Thieft trainee lady doctor sales aunt's bunglow secretly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.