पोत्यातून पैसे बॅगमध्ये भरताना लोकांनी हेरला अन्...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:15 IST2017-08-17T01:15:10+5:302017-08-17T01:15:10+5:30
नोकराने चोरलेले ३ लाख १५ हजार रुपये पोत्यात भरून आणले. या नोटा बॅगमध्ये भरताना सतर्कतेने नागरिकांनी मध्यप्रदेशातील या चोरट्यास श्रीकृष्णनगर, गारखेडा येथील मंदिरात कोंडले.

पोत्यातून पैसे बॅगमध्ये भरताना लोकांनी हेरला अन्...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नोकराने चोरलेले ३ लाख १५ हजार रुपये पोत्यात भरून आणले. या नोटा बॅगमध्ये भरताना सतर्कतेने नागरिकांनी मध्यप्रदेशातील या चोरट्यास श्रीकृष्णनगर, गारखेडा येथील मंदिरात कोंडले. त्यामुळे चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.
पकडलेल्या आरोपीचे नाव नारायण ऊर्फ तेजबली भय्यालाल केवट (१८) आहे. खडकेश्वर येथील रामनिवास गट्टानी यांच्याकडे तो वर्षभरापासून नोकर म्हणून काम करीत होता. आई आजारी असल्याचे कारण सांगून आरोपी गतमहिन्यात गावाला गेला होता. १५ आॅगस्टला सुटी असल्याने बँक बंद होत्या. एलपीजी गॅस पंपाचे मालक गट्टानी यांनी रकमेचा हिशेब लावला व ते उद्या बँकेत टाकू असे सांगून नेहमीप्रमाणे सुरक्षित ठेवले. दरम्यान, आरोपी केवट हा गावाहून आला. घरातील कोणालाही न भेटता तो तिसºया मजल्यावर जाऊन लपून बसला. घरात ठेवलेली रक्कम पोत्यात भरून तो मागच्या दाराने रात्रीच पसार झाला. त्याने गारखेडा परिसरातील मंदिर परिसरात रक्कम दडवून ठेवली. बुधवारी सकाळी त्याने नवीन सॅकवजा बॅग विकत आणली व त्यात रक्कम भरू लागला. मैदानावर खेळणाºया मुलांचे लक्ष या मुलाकडे गेले. ही काय भानगड हे पाहण्यासाठी मुले गेली. तेव्हा तो पळू लागला. मुलांनी व नागरिकांनी त्यास पकडून मंदिरात कोंडले. नागरिकांची मंदिर परिसरात गर्दी जमा झाली. (पान २ वर)