शेतकऱ्याचा मोबाइल हिसकावणारा चोर अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:04 IST2021-09-27T04:04:07+5:302021-09-27T04:04:07+5:30
औरंगाबाद : रुग्णालयात दाखल मुलास भेटण्यासाठी आलेल्या वृध्द शेतकऱ्याचा मोबाइल हिसकावणाऱ्या चोराला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून विविध कंपन्यांचे ...

शेतकऱ्याचा मोबाइल हिसकावणारा चोर अटकेत
औरंगाबाद : रुग्णालयात दाखल मुलास भेटण्यासाठी आलेल्या वृध्द शेतकऱ्याचा मोबाइल हिसकावणाऱ्या चोराला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून विविध कंपन्यांचे पाच मोबाइल हस्तगत करण्यात आले.
मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात दि.२३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते ६.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. अकबर खान रऊफ खान पठाण (४५, मूळ रा. बेगमपुरा, ह.मु. पंचायत समितीजवळ) असे मोबाइल चोराचे नाव आहे.
बाळासाहेब पंढरी शिंदे (५५, रा. आपेगाव, ता. अंबाजोगाई) यांच्या मुलाची शस्त्रक्रिया झाल्याने ते शहरात आले होते. मध्यवर्ती बसस्थानकात एसटीतून उतरून पायी जात असताना चोराने त्यांचा दहा हजारांचा मोबाइल लांबविला होता. शिंदे यांनी क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती.
पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल बांगर, सहायक फौजदार नसीम पठाण, जमादार विलास वाघ, मनोज चव्हाण, अजीज खान, संतोष सूर्यवंशी आणि देविदास खेडकर यांनी बसस्थानकाच्या आवारात अकबर खानला पकडले. अंगझडतीत त्याच्याकडून पाच मोबाइल पोलिसांनी जप्त केले. जमादार विलास वाघ पुढील तपास करीत आहेत.
(मोबाइल चोर सिंगल फोटो अकबर खान रऊफ खान पठाण)
260921\26abd_91_26092021_1.jpg
मोबाईल चोर अकबर खान रऊफ खान पठाण अटक