...‘ते’ आपल्यासोबत आज राहिले असते
By Admin | Updated: January 4, 2016 00:24 IST2016-01-03T23:51:41+5:302016-01-04T00:24:06+5:30
औरंगाबाद : सर सलामत तो पगडी पच्चास, अशी म्हण हिंदीमध्ये रूढ आहे. त्यामुळे डोके सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

...‘ते’ आपल्यासोबत आज राहिले असते
औरंगाबाद : सर सलामत तो पगडी पच्चास, अशी म्हण हिंदीमध्ये रूढ आहे. त्यामुळे डोके सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. घात-अपघातात डोक्याला मार लागल्यास मृत्यूचा धोका ८० ते १०० टक्क्यांपर्यंत असतो. संभाव्य अपघाताचा धोका टाळण्यासाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे, असा नियम करण्यात आलेला आहे. असे असताना या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या १०२ दुचाकीस्वारांना अपघातात मृत्यूला सामोरे जावे लागले. त्यांनी जर हेल्मेट परिधान केले असते तर २०१६ हे नवे वर्ष ते आपल्या कुटुंबियांसोबत साजरे करू शकले असते.
औरंगाबादच्या पाच औद्योगिक वसाहतींमध्ये आता दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरची भर पडली आहे. वाढत्या औद्योगिकरणासोबत शहराचा चोहोबाजूने झपाट्याने विस्तार होत असून, त्यासोबतच शहराची लोकसंख्याही १५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येसोबत औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील दुचाकींची संख्या तब्बल साडेसात लाखांपर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यातील सुमारे पंधरा लाख नागरिक रोज दुचाकीने प्रवास करीत असतात. मात्र, यापैकी हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या मात्र नगण्य आहे. औरंगाबाद शहरात रोज सरासरी दुचाकीस्वारांचे दोन अपघात होतात. या अपघातात गंभीर जखमी होणाऱ्या आणि मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जानेवारी ते नोव्हेंबर-२०१५ या कालावधीत शहरात ५५३ गंभीर अपघात घडल्याची अधिकृत आकडेवारी पोलीस आयुक्तालयाकडून प्राप्त झाली. यात २७० घटना गंभीर स्वरुपाच्या होत्या तर १३८ किरकोळ स्वरुपाच्या होत्या. यातील ३१७ अपघात हे दुचाकीस्वारांचे आहेत. विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या नागरिकांच्या