शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

'ते सतत म्हणायचे मराठा आरक्षणाशिवाय पर्याय नाही; कावळे यांच्या नातेवाइकांनी फोडला टाहो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 16:53 IST

परिस्थिती बिकट होती पण त्यांना मराठा आरक्षणाचा ध्यास लागला होता

- अमेय पाठक

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण आंदोलनात सक्रीय असलेले सुनील कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली, हे समजताच  छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबाने एकच टाहो फोडला. मूळचे जालन्याचे असलेले कावळे कुटुंब उदरनिर्वाहासाठी छत्रपती संभाजीनगरात राहत. मी मुंबईला जात असून आता मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांच्यासोबतच राहणार आहे. आरक्षण घेऊनच परत येणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

आंतरवाली सराटी येथील १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या सभेनंतर सुनील कावळे यांना मराठा आरक्षणाचा ध्यास लागला होता. मंगळवारी कावळे यांनी कामानिमित्त मुंबईला जात आहे असे सांगितले. इतर कार्यकर्त्यांना जरांगेंना भेटणं शक्य नाही. पण 24 ऑक्टोबरला मुंबईत मराठा आंदोलनाची सभा आहे. या सभेवेळी मनोज जरांगेंसोबत सेल्फी काढणार म्हणजे काढणार, असा निर्धार सुनील कावळे यांनी केला होता, अशी माहिती सुनील कावळे यांच्या जावयाने दिली.त्यानंतर बुधवारी रात्री कावळे यांनी मुंबईतील बीकेसी येथील उड्डाणपुलावरील लोखंडी खांबला गळफास घेत जीव संपवले. याची माहिती मिळताच कावळे कुटुंबाला धक्का बसला.

जरांगेंसोबत राहण्याचा निर्धारनोकरीला असलं तर सभेला जाता येणार नाही, सुट्टी मिळणार नाही म्हणून ते नोकरी न करता स्वत: रिक्षा चालवत होते. मी आता जरांगेंसोबतच राहणार, त्यांना सोडणार नाही असं सुनील कावळे म्हणायचे, असं कुटुंबीयांनी सांगितलं. नोकरीला असलं तर सभेला जाता येणार नाही, सुट्टी मिळणार नाही म्हणून ते नोकरी न करता स्वत: रिक्षा चालवत होते. मी आता जरांगेंसोबतच राहणार, त्यांना सोडणार नाही असं सुनील कावळे म्हणायचे, असं कुटुंबीयांनी सांगितलं.

परिस्थिती बिकट होती पण त्यांना आरक्षणाचा ध्यास होतासुनील कावळे यांची परिस्थिती हालाकिची होती. त्यांच्याकडे 1 एकरपेक्षाही कमी शेती आहे.जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील चिकनगाव हे सुनील कावळे यांचं मूळगाव. गावाकडे कमी शेती, त्यात उदरनिर्वाहाचा प्रश्न, त्यामुळे सुनील कावळे हे जालन्यावरुन छत्रपती संभाजीनगरला आले. त्यांनी सुरुवातीला ड्रायव्हर म्हणून नोकरी केली. मुंबई-पुणे या मार्गावर त्यांनी अनेकवेळा ड्रायव्हिंग केलं. गेल्या 15 ते 17 वर्षापासून ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होते. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु होता. मात्र मराठा आरक्षण आंदोलनाकडे त्यांचा कल होता. नोकरीमुळे सभेला हजर राहता येत नव्हतं. त्यामुळे त्यांनी नोकरीही सोडली. मराठ्यांना आरक्षण नाही, १-१ एकर शेती क्षेत्रात काही होत नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाशिवाय पर्याय नाही असं सुनील कावळे म्हणायचे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद