शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

"जेंव्हा सत्तेत होते तेंव्हा का नाही जमलं?"; कर्जमाफीवरून शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 18:58 IST

संजय शिरसाट यांचा ठाकरेंवर प्रहार! "तुमचा सातबारा कोरा कधी झाला?"

छत्रपती संभाजीनगर: राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफीचा फायदा १५ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात होईल, अशी घोषणा मंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार महिनाभरात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाउद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना शिरसाट म्हणाले की, "उद्धव ठाकरे सातबारा कोरा करण्याच्या गप्पा मारत होते, पण त्यांनी तसे केले असते तर आज पुन्हा कर्जमाफीची गरजच भासली नसती. ज्यांनी प्रशासन चालवले त्यांना योजनेचा अभ्यास करावा लागतो हे समजले नाही, हे दुर्दैवी आहे. त्यांना जे जमले नाही, ते महायुती सरकारने करून दाखवले आहे."

विधिमंडळातील उपस्थितीवरून टोलासंजय राऊत यांनी ठाकरेंचा आवाज बुलंद असल्याच्या दाव्यावर शिरसाट यांनी खोचक टिप्पणी केली. "बुलंद आवाज असण्यासाठी मंत्रालयात बसावे लागते. अधिवेशनात केवळ एक-दोन दिवस येऊन माध्यमांसमोर बोलल्याने जनतेचे प्रश्न सुटत नाहीत," असे ते म्हणाले.

मुंबई मनपा: मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर श्वेतपत्रिका काढलीच पाहिजे, जेणेकरून मागील काळात काय झाले ते जनतेसमोर येईल.

रोहित पवार: रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अपघात झाला की नाही, हे अहवालातून स्पष्ट होईल. हा विषय वैयक्तिक पातळीवर नेणे चुकीचे आहे.

शिखर बँक घोटाळा: शिखर समितीने क्लीन चिट दिली असली तरी, रोहित पवारांच्या अर्जावर अंतिम निर्णय उच्च न्यायालयच घेईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Why couldn't you do it in power?: Shirsat to Thackeray

Web Summary : Minister Shirsat announced farmer loan waivers would start September 15th. He criticized Thackeray for not waiving loans while in power, questioning his administrative abilities and legislative attendance. Shirsat also demanded a white paper on Mumbai's municipal corporation and commented on Rohit Pawar's factory accident.
टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर