जबरी चोरीसाठी जाणाऱ्या चौघांना पकडले
By Admin | Updated: June 18, 2014 01:39 IST2014-06-17T22:59:54+5:302014-06-18T01:39:50+5:30
परळी: महिलांचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने कार मध्ये आलेल्या दोन महिलांसह दोन पुरुषांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परळी येथील नाथ्रा परिसरात मुद्देमालासह सोमवारी अटक केली.

जबरी चोरीसाठी जाणाऱ्या चौघांना पकडले
परळी: दिवंगत केंद्रीय ग्राम विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या गोड जेवणाच्या कार्यक्रमात आलेल्या महिलांचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने कार मध्ये आलेल्या दोन महिलांसह दोन पुरुषांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परळी येथील नाथ्रा परिसरात मुद्देमालासह सोमवारी अटक केली.
छबूबाई गोरख जाधव, सखूबाई सखाराम पवार, मंगलनाथ गोरख जाधव तिन्ही रा. खंडेश्वरी मंदिर बीड व किरण मुरलीधर येडवे रा. मुर्शदपूर, ता. बीड असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे चौघे कार क्रमांक एचएच-२३ ई-६७४८ मध्ये परळी येथील या कार्यक्रमात आलेल्या महिलांचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने निघाल्याची माहिती त्या ठिकाणी असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. सदरील कार नाथ्रा परिसरात दाखल होताच पोलिसांना त्यांना पकडले. त्यांच्याकडून एक लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परळी ग्रामीण ठाण्यात बबन हिरामण राठोड यांच्या फिर्यादीवरुन चौघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. तपास पोह शेख करीत आहेत. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि सी.डी. शेवगण, सपोनि भारत जाधव, पोहेकॉ बबन राठोड, पोहेकॉ जयसिंग वाघ, कल्याण औटे, अंकुश महाजन, रविभूषण जाधवर, माया साबळे, रफिक खान यांनी केली. (वार्ताहर)