खरेदीसाठी आले अन् मोबाईल चोरले

By Admin | Updated: March 26, 2017 23:11 IST2017-03-26T23:08:29+5:302017-03-26T23:11:57+5:30

उस्मानाबाद : खरेदीच्या बहान्याने दुकानात आलेल्या युवकांनी दोन मोबाईल लंपास केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

They came for the purchase and stole mobile phones | खरेदीसाठी आले अन् मोबाईल चोरले

खरेदीसाठी आले अन् मोबाईल चोरले

उस्मानाबाद : खरेदीच्या बहान्याने दुकानात आलेल्या युवकांनी दोन मोबाईल लंपास केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना रविवारी दुपारी शहरातील ताजमहल टॉकीज परिसरात घडली़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील ताजमहल टॉकीज परिसरात असलम मैनुद्दीन शेख यांचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे़ असलम शेख हे दुकानात असताना रविवारी दुपारी दोन युवक मोबाईल खरेदीच्या बहान्याने दुकानात आले़ काही मोबाईलची पाहणी करून त्याच्या किंमतीची विचारणा युवकांनी केली़ त्यातील एकजण बाहेर गेला तर दुसऱ्याने दुकानातील १५ हजार रूपयांचे दोन मोबाईल हातोहात लंपास केले़ या प्रकरणी असलम शेख यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ शेख यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: They came for the purchase and stole mobile phones