स्वत:हून काढून घेतली जात आहेत अतिक्रमणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2017 23:21 IST2017-07-06T23:18:52+5:302017-07-06T23:21:44+5:30
हिंगोली : शहरातील मुख्यमार्गावर व इतर ठिकाणी करण्यात आलेले अतिक्रमण पालिकेतर्फे मंगळवारीच हटविण्यात येणार होते.

स्वत:हून काढून घेतली जात आहेत अतिक्रमणे
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील मुख्यमार्गावर व इतर ठिकाणी करण्यात आलेले अतिक्रमण पालिकेतर्फे मंगळवारीच हटविण्यात येणार होते. परंतु आषाढी एकादशी निमित्त नर्सी नामदेव येथे पोलीस बंदोबस्त असल्याने, पालिकेची अतिक्रमण हटाव मोहिम लांबणीवर गेली असली तरीही बहुतांश अतिक्रमण धारक स्वत:हून अतिक्रमण काढून घेत असल्याचे गुरुवारी दिसून आले.
पालिकेतर्फे शहरातील अतिक्रमण हटवून मोकळ्या झालेल्या जागेत वृक्ष लागवड केली जाणार आहे. परंतु गुरुवारी आलेल्या अंदाज समितीमुळे पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम लाबंणीवर गेली आहे. मात्र येत्या दोन ते तीन दिवसांत अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचे सीओ रामदास पाटील यांनी सांगितले. तसेच वृक्ष ४ हजार ८५० वृक्ष लागवडीचे पालिकेतर्फे नियोजन केले आहे. वृक्षलागवडीचे टेंडरही दिल्याची माहिती पालिकेने दिली.