गरज तिथे चारा छावणी होणार
By Admin | Updated: April 18, 2016 00:58 IST2016-04-18T00:58:02+5:302016-04-18T00:58:02+5:30
औरंगाबाद : दुष्काळाचे चटके चैत्र महिन्यातच जास्त प्रमाणात बसू लागले आहेत. उन्हाचा पारा चढत चालल्यामुळे ग्रामीण भागात पाणी, चारा टंचाई निर्माण होत आहे.

गरज तिथे चारा छावणी होणार
औरंगाबाद : दुष्काळाचे चटके चैत्र महिन्यातच जास्त प्रमाणात बसू लागले आहेत. उन्हाचा पारा चढत चालल्यामुळे ग्रामीण भागात पाणी, चारा टंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे ज्याठिकाणी चारा-पाण्याची परिस्थिती बिकट आहे, तेथे चारा छावणी सुरू करण्यासंदर्भातचे प्रस्ताव आले आहेत. त्यांना तात्काळ परवानगी देण्यात येणार आहे़ जिथे गरज तिथे चारा छावणी, असे धोरण आता शासनाच्या सूचनेनुसार प्रशासनाकडून राबविण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ़ उमाकांत दांगट यांनी दिली़
सध्या मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांमध्ये एकूण ३५६ चारा छावण्यात सुरू आहेत़ बीड जिल्ह्यातील २६५ चारा छावण्यांमध्ये २ लाख ६० हजार १०४ मोठे तर २० हजार ३९२ छोटे, असे एकूण २ लाख ८० हजार ४९६ जनावरे आहेत़ लातूर जिल्ह्यात ३ चारा छावण्यांमध्ये १ हजार ५२८ मोठे तर १६७ छोटे, असे एकूण १,६९५ जनावरे आहेत़ उस्मानाबाद जिल्ह्यात ८८ चारा छावण्यांमध्ये ७९ हजार ५८७ मोठे तर ९ हजार ६०८ छोटे, असे एकूण ८९ हजार १९५ जनावरे आहेत़ एकूण ३५६ छावण्यांमध्ये सध्या ३ लाख ७१ हजार ३८६ छोटे-मोठे जनावरे असून, त्यांच्या चारा-पाण्याची याठिकाणी सोय करण्यात आली आहे़