राज्यातून आठ हजार हज यात्रेकरू जाणार
By Admin | Updated: June 17, 2014 01:09 IST2014-06-17T00:46:00+5:302014-06-17T01:09:14+5:30
औरंगाबाद : पवित्र हज यात्रेसाठी महाराष्ट्रातून यंदा ८ हजार २०२ यात्रेकरू जाणार आहेत.

राज्यातून आठ हजार हज यात्रेकरू जाणार
औरंगाबाद : पवित्र हज यात्रेसाठी महाराष्ट्रातून यंदा ८ हजार २०२ यात्रेकरू जाणार आहेत. मराठवाड्यातून जाणारे यात्रेकरू चिकलठाणा विमानतळावरून उड्डाण भरणार आहेत. त्यांची संख्या २ हजार ३९२ असल्याची माहिती राज्य हज कमिटीचे सिराज इनामदार, फारुक पठाण यांनी दिली.
औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, यात्रेकरूंच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काही नागरिक आजारी असल्याने किंवा विविध गंभीर कारणांमुळे यात्रेला जाऊ शकत नाहीत. त्यांच्या जागेवर प्रतीक्षा यादीत असलेल्यांना संधी देण्यात येईल. यंदा महाराष्ट्रातील ४८ हजार नागरिकांनी हज यात्रेसाठी अर्ज केले होते. दोन वर्षांपूर्वीपर्यंत महाराष्ट्राच्या वाट्याला १० हजारांहून अधिक जागा मिळत होत्या. मागील वर्षीपासून महाराष्ट्राचा वाटा तब्बल २० टक्क्यांनी घटविण्यात आला आहे.
हज कमिटीकडे येणाऱ्या अर्जांपैकी अनेक जण ७० वर्षांहून अधिक वय असलेले नागरिक असतात. त्यांच्यासाठी जागा आरक्षित ठेवलेल्या आहेत. सतत तीन वर्षांपासून अर्ज करणाऱ्यांनाही चौथ्या वर्षी थेट यात्रेची संधी दिली जाते. उर्वरित अर्जांमध्ये ड्रॉ काढण्यात येतो. चिकलठाण्यासह मुंबई, नागपूर विमानतळावरून यात्रेकरू रवाना होतील.