कंधारात जलशुद्धीकरण यंत्राचे ६९ प्रस्ताव झाले दाखल

By Admin | Updated: June 24, 2014 00:41 IST2014-06-24T00:32:38+5:302014-06-24T00:41:12+5:30

प्रा. गंगाधर तोगरे, कंधार अशुद्ध पाण्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक रोगाचा सामना करावा लागतो़ त्यामुळे तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीत जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यासाठी

There were 69 proposals for water purification system in Kandahar | कंधारात जलशुद्धीकरण यंत्राचे ६९ प्रस्ताव झाले दाखल

कंधारात जलशुद्धीकरण यंत्राचे ६९ प्रस्ताव झाले दाखल

प्रा. गंगाधर तोगरे, कंधार
अशुद्ध पाण्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक रोगाचा सामना करावा लागतो़ त्यामुळे तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीत जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यासाठी गटविकास अधिकारी ए़ एस़ कदम यांनी मागील महिन्यात संकल्प सोडला़ त्याला ग्रा़ पं़ नी सकारात्मक प्रतिसाद देत ६९ प्रस्ताव सादर झाले आहेत़ त्यातून रोगराई हद्दपार होवून गावाचे आरोग्य बळकट होण्यास वाव मिळणार आहे़
तालुक्यात ग्रामपंचायतीची संख्या ११६ आहे़ ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळणे मोठे दिवास्वप्न ठरते़ तहान भागविण्यासाठी विहीर, विंधन विहिरीच्या पाण्याचा सर्रासपणे वापर करावा लागतो़ पाण्याचा अशुद्ध व दूषितपणा आरोग्य निरोगीपणाला मोठा अडथळा ठरतो़ दूषित पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, टायफाईड, घसादुखी, त्वचाविकार, विषाणुजन्य आजाराचा धोका असतो़ जमिनीतील खोलवरचे पाणी पिण्यासाठी वापरल्यास फ्लोरोसीस आजार होण्याची शक्यता असते़ कारण त्यात फ्लोराईडचे प्रमाण अधिक असते़ जास्त काळ असे पाणी सेवन केल्यास सुरुवातीला दात वाढ व आकारावर त्याचा परिणाम होतो़ हाडात हळूवारपणे फ्लोराईड जमा होवून नानाविध आरोग्य समस्येचा सामना करावा लागतो़ त्यासाठी गटविकास अधिकारी यांनी निरोगी आरोग्याचा संकल्प सोडला़
शासनाच्या विविध योजनेतून विविध विकासासाठी मोठा निधी येतो़ त्यातून जलशुद्धीकरण यंत्र बसविण्याचे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते़ त्यामुळे आलेगाव गावात ३ लाखांचे जलशुद्धीकरण यंत्र बसविण्याचा प्रस्ताव दाखल झाला आहे़ आंबुलगा-३ लाख, औराळ-३ लाख, बाभूळगाव -३ लाख, बाचोटी- ३ लाख, भूकमारी- ३ लाख, भुत्याचीवाडी - ३ लाख, बिजेवाडी- ३ लाख, बोळका - ३ लाख, बोरी (खु़)-३ लाख, चिंचोली (पक़़)-३ लाख, चौकी धर्मापुरी-३ लाख, दाताळा, धानोरा कौठा, दिग्रस बु़, गांधीनगर, गंगनबीड, गऊळ, घोडज, घागरदरा, घुबडवाडी, गोगदरी, गोणार, गुंटूर, हाडोळी (ब्ऱ), हाळदा, हटक्याळ, हिप्परगा (शहा), इमामवाडी, जाकापूर, जंगमवाडी, कल्हाळी, कौठा, खंडगाव (ह़), कोटबाजार, लाडका, लालवाडी, महालिंगी, मजरे धर्मापुरी, मंगलसांगवी, मरशिवणी, मसलगा, मुंडेवाडी, नागलगाव, नंदनशिवणी, नंदनवन, नारनाळी, पानभोसी, पांगरा, रूई, पानशेवडी, पाताळगंगा, पेठवडज, पोखर्णी, रहाटी, राऊतखेडा, संगुचीवाडी, सावरगाव (नि़), शिराढोण, शिरसी बु़, शिरसी खु़, शिरूर, तेलूर, उमरगा (खो), उमरज, वहाद, वाखरड, वरवंंट व येलूर या सर्व ग्रामपंचायतीचे अंदाजित ३ लाख रुपये किंमतीचे प्रस्ताव दाखल झाले आहेत़
२०१४-१५ च्या बीआरजीएफ जिल्हा वार्षिक नियोजनातून जलशुद्धीकरण यंत्रे बसविण्यात येणार आहेत़ हा मिळणारा निधी काही गावात कमी मिळणार आहे़ तरी अन्य निधीतून कसा मिळवला जातो आणि जलशुद्धीकरणाचा मार्ग मोकळा कसा होतो हे काही दिवसात कळणार आहे़ काटकळंबा गावात बसवलेले यंत्र नागरिकांचा उत्साह वाढविणारे ठरत आहे़ त्यामुळे ६९ गावांत आरोग्यवाढीस चालना मिळेल़

Web Title: There were 69 proposals for water purification system in Kandahar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.