सणासुदीसाठी आली ६ हजार क्विंटल साखर

By Admin | Updated: August 18, 2014 00:33 IST2014-08-18T00:06:04+5:302014-08-18T00:33:20+5:30

सणासुदीसाठी आली ६ हजार क्विंटल साखर

There were 6 thousand quintals of sugar for the festival | सणासुदीसाठी आली ६ हजार क्विंटल साखर

सणासुदीसाठी आली ६ हजार क्विंटल साखर

नांदेड : आगामी काळ हा सणासुदीचा आहे़ त्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यासाठी ६ हजार १४४ क्विंटल साखरेचे नियतन मंजूर करण्यात आले आहे़ त्यामुळे लाभार्थ्यांचे सणासुदीच्या काळात तोंड गोड होणार आहे़
गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्ह्यातील रेशन दुकानांवर साखरच उपलब्ध नव्हती़ त्यामुळे बीपीएल व अंत्योदय लाभार्थ्यांना बाजार भावानुसार साखर घ्यावी लागत होती़ त्यात आता सणासुदीच्या काळात साखरेचे नियतन मंजूर झाल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे़ बीपीएल व अंत्योदय लाभार्थ्यांसाठी १३ रुपये ५० रुपये प्रतिकिलो व प्रति व्यक्ती ६०० ग्रॅम साखर लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे़
(प्रतिनिधी)

Web Title: There were 6 thousand quintals of sugar for the festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.